*🌹🌹लालित्य नक्षत्रवेल समूह अडमीन लेखिका कवयित्री सौ. भारती भाईक यांची अप्रतिम काव्यरचना🌹🌹*
*💕💕समर्पण💕💕*
उधळून रंग जेव्हा तू पाहिलेस कृष्णा
ते अंतरात भरुनि क्षण राहिलेत कृष्णा❣️
सोडून केस माझे शृंगार मांडता मी
आणून चंद्र तारे तू माळिलेस कृष्णा❣️
लाजून शब्द माझे ओठात थांबलेले
माझ्या मनातले ते तू गाइलेस कृष्णा❣️
घेताच श्वास माझा स्पंदन तुझे घडावे
प्रेमातले समर्पण तू दाविलेस कृष्णा❣️
निःस्वार्थ प्रेम व्हावे जगतास सांगतांना
त्याचे सुरेख निकष तू लाविलेस कृष्णा❣️
राधा म्हणून मी तर आहे समर्पिता की
प्रेमात आज भरुनि मी पावलेच कृष्णा❣️
❣️💕💕सौ. भारती भाईक🌹🌹