You are currently viewing मुंबई विद्यापीठ उपकेंद्राच्यावतीने समाजकार्य सप्ताहाचे औचित्य साधून महिलांचा सन्मान…

मुंबई विद्यापीठ उपकेंद्राच्यावतीने समाजकार्य सप्ताहाचे औचित्य साधून महिलांचा सन्मान…

सावंतवाडी

मुंबई विद्यापीठ उपकेंद्र सिंधुदुर्गच्या वतीने जिल्ह्यातील ज्येष्ठ महिलांच्या खास मुलाखती घेण्यात आल्या. तसेच यावेळी या उपक्रमात सहभागी “त्या” महिलांचा सन्मान करण्यात आला. समाजकार्य सप्ताहाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिंधुदुर्ग उपकेंद्र प्रभारी संचालक श्रीपाद वेलिंग, रत्नागिरी उपकेंद्र प्रभारी संचालक किशोर सुखटणकर यांनी मार्गदर्शन केले.

प्रत्येक वर्षाच्या मार्च महिन्यातील तिसऱ्या आठवड्यातील मंगळवारी हा जागतिक समाजकार्य दिवस २००७ पासून साजरा केला जात आहे. दरवर्षी वेगवेगळ्या थीम IFSW ( इंटरनेशनल फेडरेशन ऑफ सोशल वर्करस) या संस्थेकडून ठरविल्या जातात. या वर्षाचे समाजकार्य दिनाची थीम “को बिल्डींग न्यू इको सोशल वर्ल्ड : लिविंग नो वन बिहाइंड” ही होती. या थीम प्रमाणेच समाजातील कोणताही घटक मागे राहू नये, यासाठी काम करण्याऱ्या सिंधुदुर्ग मधील धडाडीच्या कार्यकर्त्या श्रीम.वंदना करंबेळकर संचालिका, निरामय विकास केंद्र कोलगाव, श्रीम.अर्पिता मुंबरकर, संचालिका गोपुरी आश्रम कणकवली, श्रीम.रेखाताई गायकवाड संस्थापक अध्यक्षा,माऊली महिला मंडळ शिरोडा, श्रीम.चारुशीला देऊलकर ज्येष्ठ समुपदेशक, मालवण तसेच श्रीम.कमलताई परुळेकर जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, पणदूर, या सप्ताह दरम्यान विशेष मुलाखतीसाठी उपस्थित होत्या. यावेळी समाजकार्य विभागाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला व त्यांच्या मुलाखतीतून त्यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास विद्यार्थ्यासमोर मांडण्यात आला. विद्यार्थ्यांनी समाजकार्य करत असताना संयम, जिद्द,सातत्य आणि वाचन ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे, तसेच सामाजिक बदल घडला पाहिजे यासाठी आपण झटले पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला. समाजात असणारया विविध समस्यावर त्यांनी मुलाखतीदरम्यान प्रकाश टाकला.

जागतिक समाजकार्य सप्ताहानिमित्त समाजकार्याच्या विद्यार्थ्याकरिता सामाजिक कार्यात भारतीय महिलांचे योगदान या विषयावरील पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. समारोपाच्या दिवशी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.यामध्ये कु.प्रियंका कांबळे हिला प्रथम क्रमांक,कु.सृष्टी तावडे द्वितीय क्रमांक,कु.मेघा वजराटकर तृतीय क्रमांक तर उत्तेजनार्थ कु.वनिता जंगले आणि कु.वैष्णवी कदम हिला परितोषित देण्यात आले.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. माया रहाटे, प्रा. अमर निर्मळे, प्रा. पुनम गायकवाड यांनी परिश्रम घेतले तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे ही मोलाचे सहकार्य मिळाले. या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग उपकेंद्र प्रभारी संचालक श्रीपाद वेलींग व रत्नागिरी उपकेंद्र प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + 17 =