माजी नगरसेवक यतीन खोत आणि सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांचा पुढाकार
मुलांसोबत केक कापून आणि कडधान्याचे वाटप करत वाढदिवस साजरा..
मालवण :
दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत. माजी नगरसेवक यतीन खोत आणि सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. मालवणमधील फातिमा कॉन्व्हेंटमध्ये मुलांसोबत केक कापून आणि कडधान्याच वाटप करत हा वाढदिवस साजरा करण्यात आला.
फातिमा कॉन्व्हेंट मालवणमध्ये माजी नगरसेवक यतीन खोत आणि सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांच्या पुढाकारातून आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सुरुवातील मुलांसोबत केक कापण्यात आला. यावेळी मुलांचाही चेहऱ्यावर हसू फुललं होत.
त्यानंतर कडधान्याचंही वाटप करण्यात आलं. यावेळी काशिनाथ मोरजकर, प्रकाश खोत, आशिष शेडगे, अनिकेत आचरेकर, मांजरेकर सर, सुवर्णा चव्हाण, विजय कांबळी, प्रतिभा चव्हाण, शांती तोंडवळकर, दिव्या पवार, साक्षी मयेकर, अल्पेश वराडकर, वसंत मांजरेकर, मंदार कांदळकर आदी उपस्थित होते. या मदतीसाठी फातिमा कॉन्व्हेंटच्यावतीने यतीन खोत आणि शिल्पा खोत यांचे आभार मानण्यात आले.