ओरोस
शालेय विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी बुद्धिबळ सारखी स्पर्धा आयोजीत करून मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी महाराट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा मालवण आयोजित व प्राथमिक शिक्षक सुयोग मारूती धामापूरकर पुरस्कृत बुद्धिबळ स्पर्धा उदघाटन प्रसंगी बोलताना केले.
महाराट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा मालवण आयोजित व प्राथमिक शिक्षक सुयोग मारूती धामापूरकर पुरस्कृत बुद्धिबळ स्पर्धा मालवण तालुका मर्यादित जि प प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ली ते ५ वी , इयत्ता ६ वी ते ८ वी व प्राथमिक शिक्षकांसाठी अश्या तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली.
यात एकूण ६९ स्पर्धकांनी भाग घेतला होता. या उपक्रमाला गटविकास अधिकारी श्री जाधव, गटशिक्षणाधिकारी संजय माने, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नितिन कदम , मार्गदर्शक भाई चव्हाण, तालुकाध्यक्ष परमानंद वेंगुर्लेकर, चंद्रसेन पाताडे, सचिव नवनाथ भोळे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे , प्रकाश झाडे, जिल्हा सदस्य राजन जोशी, तालुका शिक्षक नेते मंगेश कांबळी, तालुका कार्याध्यक्ष रुपेश गरुड , उपाध्यक्ष व पुरस्कर्ते सुयोग धामापूरकर, कोषाध्यक्ष तथा संचालक राजेंद्र प्रसाद गाड, तालुका महिला मंच अध्यक्षा नेहा तांबे, सचिव भाग्यश्री वाडकर, राष्ट्रीय पंच श्रीकृष्ण आडेलकर, सांखिकी वि. अ. श्री सावंत आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तालुका उपाध्यक्ष सुयोग थामापूरकर यांनी केले. तर आभार तालुका सचिव नवनाथ भोळे यांनी मानले. स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे १ ली ते ५ वी गट प्रथम – कार्त्तिक अनिल पाताडे (शाळा सुकळवाड), द्वितीय यशश्री गुरुनाथ ताम्हणकर (मसुरे नं१), हेमंत शशिकांत तिळवे -तिरवडे, राजेश लिलाधर पाताडे – सुकळवाड, निधी प्रदिप वराडकर – वराड देऊळवाडा.६ वी ते ८ वी प्रथम-अथर्व मंगेश गायकवाड – तिरवडे, द्वितीय अनिरुद्ध नरोत्तम गायकवाड – तिरवडे, आर्या उमेश गावडे -तिरवडे , घनश्याम वैभव पाताडे – सुकळवाड, चंद्रेश ललित पाताडे – सुकळवाड. शिक्षक वर्ग प्रथम भिमाशकर शेतसंधी – चिंदर कुंभारवाडी, द्वितीय सुयोग धामापूरकर – तिरवडे, तृतीय विनित देशपांडे – नांदरुख आमडोस, चतुर्थ श्रीम. पुनम हजारे – मठ बुदुक पाणलोस, पाचवा राजन जोशी – चिंदर बाजार अशाप्रकारे स्पर्धेमध्ये विजेते ठरले.