You are currently viewing सेना, काँगेस पदाधिकारी यांचा राष्ट्रवादी प्रवेश

सेना, काँगेस पदाधिकारी यांचा राष्ट्रवादी प्रवेश

सावंतवाडी : आगामी नगरषरिद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष बाबल्‍या दुभाषी, शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुख राकेश नेवगी व गणेश निंबाळकर यांनी पक्षप्रवेश करत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.

स्वबळाची भाषा करण्यासाठी सध्याची परिस्थिती काय याची कल्पना सर्वांना आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी बळकट असताना देखील आमचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार महाविकास आघाडीकरून निवडणूका लढवायला प्राधान्य देत आहेत. काही काही लोकांना जर स्वबळाची खुमखुमी असेल तर त्यांनी त्याची परिक्षा घ्यावी, निवडणूका या पाच वर्षांनी येतात‌. त्यावेळीसाठी राष्ट्रवादी स्वबळाची तयारी करत आहे हे आज आम्ही या पक्षप्रवेशातून दाखवून दिल. आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची ताकद दाखवून देऊ, प्रत्येकाला आपल्या पक्षाचा विस्तार करायचा अधिकार आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी वाढविण्यासाठी आम्हीसुद्धा प्रयत्न सुरू केले आहेत. आजच्या प्रवेशाने सावंतवाडीत राष्ट्रवादी पक्षाला आणखीन बळकटी मिळणार आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचा प्रत्यय पाहायला मिळेल. आगामी निवडणुका आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी सुद्धा पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले. या प्रवेशानं सावंतवाडीत शहरात राष्ट्रवादी पक्षाला आणखीन बळकटी मिळाली आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचा प्रत्यय पाहायला मिळणार असून येत्या काही दिवसांत असे अनेक पक्षप्रवेश पहायला मिळतील असा विश्वास तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केला. विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी पक्षप्रवेश केलेल्या नव्या शिलेदारांच स्वागत करत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, भास्कर परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,औ प्रफुल्ल सुद्रिक, हिदायतुल्ला खान, शहराध्यक्ष देवा टेमकर, अफरोज राजगुरु, इफ्तेकार राजगुरू, युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर, रिद्धी परब, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, बावतीस फर्नांडिस, प्रसाद दळवी, याकुब शेख आदींसह मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + four =