जागतिक साहित्य कला व्यक्तित्वविकास मंच, गझल प्रावीण्य, गझल मंथन ग्रुप सदस्या लेखिका कवयित्री सौ.शोभा वागळेयांची अनलज्वाला वृत्तातील अप्रतिम गझल रचना
काफियारंभ गझल
💐प्रतीक💐
आधाराचे प्रतीक असते म्हणजे बाई
सौभाग्याचे प्रतीक असते म्हणजे बाई
रीत मुलांना बालपणी ती लावत असते
संस्काराचे प्रतीक असते म्हणजे बाई
आल्या गेल्या सर्वांचे ती सदैव करते
कर्तव्याचे प्रतीक असते म्हणजे बाई
मायेने ती घरातल्यांची कामे करते
वात्सल्याचे प्रतीक असते म्हणजे बाई
गरीब गरजू लोकांसाठी सदा धावते
कैवल्याचे प्रतीक असते म्हणजे बाई
शोभा वागळे
मुंबई.
०८/०३/२०२२