You are currently viewing वनविभागातर्फे औषधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान व विपणन प्रशिक्षण

वनविभागातर्फे औषधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान व विपणन प्रशिक्षण

सिंधुदुर्गनगरी

सामाजिक वनीकरण विभाग, वनविभाग, पश्चिम विभागीय औषधी सहसुविधा केंद्र, वनस्पती शास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दि. 26 मार्च 2022 रोजी औषधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान व विपणन या विषयी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

                कुडाळ येथील वासुदेवानंद सभागृहामध्ये सकाळी 9.30 ते 5 या वेळेत हे प्रशिक्षण होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांच्या हस्ते होणार आहे.

                सकाळी 9 ते 9.30 या वेळेत प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी होणार आहे. 9.30 ते 9.45 या वेळेत कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सिंधुदुर्गातील औषधी वनस्पती ओळख व लागवड तंत्रज्ञान याविषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रिजनल डायरेक्टर दिगंबर मोकाट हे मार्गदर्शन करतील. जिल्ह्यात बांबू लागवडीविषयी कृषी तज्ज्ञ मिलींद पाटील, आयुर्वेदात औषधी वनस्पतींच्या कच्चा मालाची उपयुक्तता याविषयी आयुष आयुर्वेदाचे डॉ.स्वप्निल शिंदे, औषधी वनस्पतींचे विपणन याविषयी वेलकेअर नॅचरलचे किरण अभ्यंकर हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सुभाष पुराणिक, विभागीय वनअधिकारी, सामाजिक वनीकरण, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा