You are currently viewing पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड दौऱ्यावर

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड दौऱ्यावर

28, 29, 30 मार्च रोजी ठाकरे यांच्या हस्ते विविध विकासात्मक कामांचे उद्घाटन व भूमिपूजन..

 

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात विविध विकासात्मक कामासाठी दौऱ्यावर येत आहेत. 28, 29, 30 मार्च रोजी ठाकरे हे सिंधुदुर्ग रत्नागिरी व रायगड दौऱ्यावर येणार आहे. त्यांच्या उपस्थितीत रत्नागिरीतील अनेक विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम होणार आहेत असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या राज्य दौऱ्याचा प्रारंभ कोकणातून होणार आहे. 28 मार्च सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी त्यांची उपस्थित असल्याचे सामंत यांनी सांगितले. 28 रोजी सकाळी 10 वाजता सिंधुदुर्गातील मेरीटाईम बोर्डाची पाहणी, कुणकेश्वर, देवगड येथे भूमिपूजन कार्यक्रम तसेच वेंगुर्ला येथे कासव जत्रा उद्घाटन कार्यक्रमास ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पोमेंटो कंपनीकडून पर्यटनासाठी तयार असलेल्या फाइव्ह स्टार हॉटेलची पाहणी ते करणार आहे. तसेच सिंधुरत्न योजनेचे लोकार्पण व कुडाळ येथील शिमगोत्सव कार्यक्रमाला ठाकरे यांची उपस्थिती लाभणार आहे.

तर 29 मार्च रोजी मंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग-रत्नागिरी कडे प्रयाण केल्यानंतर त्यांच्या हस्ते लांजा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्यानाचे उद्घाटन होणार आहे. दुपारी 3 वाजता रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे आगमन होईल. त्या ठिकाणी श्रीचे दर्शन घेतल्यानंतर 21 कोटींच्या निधीतून नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन व सभा असे कार्यक्रम होणार आहेत.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पडते, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, निवृत्ती तारी, तेजस मामघाडी तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा