You are currently viewing शांतिब्रह्म एकनाथ थोर श्रेष्ठ संत

शांतिब्रह्म एकनाथ थोर श्रेष्ठ संत

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य गीतकार,संगीतकार, गायक अरुण गांगल यांची नाथ षष्ठी निमित्त श्री एकनाथ महाराजांना वंदन करणारी काव्यरचना!

शांतिब्रह्म एकनाथ थोर श्रेष्ठ संत
सुपुत्र सूर्य प्रगटले नमो गुरुपाद ।।ध्रु।।
जन्म झाला नाथांचा कुळकर्णी घराण्यांत
सूर्यनारायण रुक्मिणीचे थोर सुपुत्र
आजोबा चक्रपाणी आजी सरस्वतीमात।।1।।
विजयनगर नृपे विठुस केले भूमिगत
भक्ती सामर्थ्ये सूक्ष्म रूपे केले त्याला मुक्त
भानुदासांनी विठूला स्थापिले पंढरीत ।।2।।
नाथांना ओढ परमार्थाची बाल्यापासून
गुरू लाभले देवगिरीचे जनार्दन संत
गुरु सेवा केली त्यांनी मिळवले आशीर्वाद।।3।।
सर्व विद्यांचा केला अभ्यास गुरु आज्ञेत
डोंगरी गुरुंनी घडविले दत्त दर्शन
ज्ञानप्रकाश उजळला त्यांचे अंतरंगात ।।4।।
गुरुआज्ञे केले तप शुलभंजना पर्वत
विळखा घातला त्यांना पाच फड्या शेषानं
आत्मानंदे निर्भय झाले काळच अंकित।।5।।
ग्रंथ लिहिला नाथांनी चतु:श्लोकी भागवत
भावार्थ रामायण लिहिला ओव्यांचा ग्रंथ
एका जनार्दनी अर्पिले नाममुद्रांकीत ।।6।।
एकनाथी भागवत लिहिला सोप्या भाषेंत
नाथांनी केली गुरुसेवा अनन्य गुरुभक्त
श्रीखंड्या रूपे सेवा केली नाथांकडे कृष्णानं।।7।।
रुक्मिणी स्वयंवर आनंदलहरी शुकाष्टक
गीतासार हस्तामलक स्वात्मसुख,भारुड
अभंग गवळणी नाथांनी रचिल्या प्रचंड।।8।।
ज्ञानेश्वरांची समाधी होती दाट जंगलात
ज्ञानांच्या कंठी लागली मुळी नाथां दृष्टांत
अजानांची मुळी नाथांनी काढली केले मुक्त।।9।।

श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन 410201.
Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा