You are currently viewing तुळस येथील प्रतिथयश डॉ.राजू आंगणे यांचे निधन

तुळस येथील प्रतिथयश डॉ.राजू आंगणे यांचे निधन

वेंगुर्ले
तालुक्यातील तुळस खरीवाडा येथील प्रतिथयश डॉ. राजू आंगणे वय ५५ यांचे आज बुधवार २३ मार्च रोजी रात्री मुंबई येथे निधन झाले.
त्यांचं शिक्षण वेंगुर्ला येथील होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये झालं, आरवली टांक येथे ग्रामीण भागात गेली कित्येक वर्षे ते वैद्यकीय सेवा देत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई-वडील, भाऊ, बहिणी,चुलते असा मोठा परिवार आहे.
डॉ. आंगणे यांची अचानक झालेली एक्सिट मनाला चटका लावून जाणारी आहे. अनेक रुग्णांना देवदूत ठरत असताना अगदी तरुण वयात डॉक्टरांच निधन झाल. त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान कायम स्मरणात राहील अशा शब्दात अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा