कुडाळ
माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी कुडाळ येथील अविनाश पराडकर यांची निवड कुडाळ येथे करण्यात आली.
या संघटनेच्यावतीने ही निवड कुडाळ एमआयडीसी येथील विश्रामगृह येथे करण्यात आली यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश सकुंडे, महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेश माने, डॉ. कमलेश चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा सौ राजश्री गावडे, सावंतवाडी तालुका अध्यक्ष प्रसाद मडगांवकर, अक्षय तळवडेकर, विष्णू चव्हाण, जाफर शेख, ययाती नाईक, वृषभ शिगले, रोहन मिशाले, राजवीर पाटील आदी उपस्थित होते.