शरीर एक दिव्य कॉम्प्युटर (Human body is a divine computer)
*शरीर ही परमेश्वराची जीवंत मूर्ती आहे त्याचप्रमाणे तो दिव्य संगणक (Divine Computer) आहे.आपण जो संगणक पाहतो,तो माणसाने निर्माण केलेला आहे.परंतु मानवी शरीररूपी दिव्य संगणक हा परमेश्वराने निर्माण केलेला आहे.* जन्मल्यापासून मरेपर्यंत माणूस सतत कर्म करीत असतो.
*विचार-उच्चार-आचार या स्वरूपात माणूस सतत कर्म करीत असतो व या कर्मांच्या द्वारे प्रत्येक माणूस शरीररूपी दिव्य संगणकाला फिडींग करीत असतो.सामान्य संगणकाला आपण जे अचूक किंवा चुकीचे फिडींग करतो त्याप्रमाणे त्या संगणकाकडून आपल्याला रिझल्टस् मिळत असतात.त्याचप्रमाणे विचार-उच्चार-आचार यांच्या द्वारा आपण शरीररूपी संगणकाला ज्या चांगल्या किंवा वाईट कर्माचे (Actions) फिडींग करू,त्याप्रमाणे आपल्याला सुखाचे किंवा दुःखाचे रिझल्टस् मिळत असतात.* या संदर्भात ग्रीक फिलॉसॉफर एपिक्टेटस् यांचे खालील वचन चिंतनीय आहे –
” *You ought to be more concerned about removing wrong thoughts from your mind than about removing tumors and abscesses from the body.”*
*दुसरा मुद्दा असा की,आपण ज्याप्रमाणे स्वत:च्या शरीररूपी संगणकाला फिडींग करतो त्याचबरोबर (Simultaneously)* *आपण इतर लोकांच्या शरीररूपी कॉम्प्युटरला फिडींग करीत असतो.अशा पद्धतीने लोक स्वत:च्या व इतरांच्या शरीररूपी संगणकांना फिडींग करीत करीत स्वत:चे व इतरांचे जीवन घडवीत किंवा बिघडवीत असतात.* म्हणून माणसाला व तो ज्या समाजात राहतो त्या समाजाला जर *सुख, शांती, समाधान,आनंद,यश व समृद्धी हे सर्व पाहिजे असेल तर प्रत्येक मानवी शरीर हा दिव्य संगणक आहे हे नित्य लक्षात ठेवून लोकांनी परस्परांना उत्कृष्ट विचार-उच्चार-आचार यांच्या द्वारा उत्तम फिडींग केले पाहिजे.* परंतु प्रत्यक्ष परिस्थिती मात्र अगदी याच्या उलट आहे.अनिष्ट विचार-उच्चार-आचार यांच्या द्वारे लोक स्वत:च्या व इतरांच्या संगणकांना अनिष्ट गोष्टींचे फिडींग करून स्वत:ला व इतरांना दुःखाच्या खाईत लोटीत असतात.थोडक्यात,उत्कृष्ट कर्मांचे (Actions) फिडींग करून सुखी व्हायचे की अनिष्ट कर्माचे फिडींग करून दु:खी व्हायचे हे माणसाच्या हातात आहे.या संदर्भात डॉ.मर्फी यांचे खालील वचन चिंतनीय आहे –
” *Any thought or action which is not harmonious whether through ignorance or design results in discord and limitation of all kinds.* ”
म्हणूनच जीवनविद्या सांगते-
*” तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”*
~ सद्गुरु श्री. वामनराव पै.