सावंतवाडी
अथायु मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान चे अध्यक्ष तथा जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस यांच्या शुभ हस्ते रविवारी 20 रोजी फीत कापून झाले.
यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष दैव्या सूर्याजी, डॉ. राहुल चौगुले, मा .मदन गोरे, मार्केटिंग हेड मा. अक्षय सुतार, मा.जमील मनियार, मा.दिनेश दावले, मा.विजय हराळे, मा.प्रशांत पडते, मा.सुरेश शिरोडकर, सौ . सिद्धी हरमलकर आदींच्या उपस्थितीत झाला.
या आरोग्य शिबिरात हृदय विकार कॅन्सर मणक्याचे आजार गुडघ्याची शस्त्रक्रिया मुतखडा शस्त्रक्रिया मुत्रविकास हाडांची शस्त्रक्रिया मेंदूची शस्त्रक्रिया अशा विविध प्रकारच्या रुग्णांची तपासणी करून व्यक्ती व रुग्णांकडे पिवळे केशरी अंत्योदय व अन्नपूर्णा तसेच सफेद रेशन कार्ड त्याच प्रमाणे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड अशांना मोफत शस्त्रक्रिया करून यामध्ये औषधे व जेवण या महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत दिले जाते
यासाठी सावंतवाडी तालुक्यातील 265 अधिक रुग्णांनी तपासणी करून देण्यात आली. ज्या रुग्णांची शस्त्रक्रिया आहे त्यांना मोफत अथायू मल्टीपेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या सौजन्याने रुग्णांना मोफत बस सेवा आयोजन करण्यात आले असून रुग्णांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना पुन्हा घरपोच बस सेवा देण्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मध्ये एन्जोग्राफी 6500 रूपयांचा येणारा खर्च मोफत केला जाईल तसेच मुतखडा व पोसटेल शस्त्रक्रिया व इतर आजारांसाठी लागणारे सोनोग्राफी मोफत केली जाईल कोल्हापूर मध्ये हे आयोजन सावंतवाडीचे जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजु मसुरकर केले आहे
ही आरोग्य 2013 नोव्हेंबर साली योजना प्रथम राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने सुरू करण्यात आली त्या नंतरच्या काळामध्ये 2017 जून रोजी युती सरकारच्या काळांमध्ये याचे नाव महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना या नावाने महाराष्ट्राच सुरु करण्यात आली
28 जिल्ह्यांना मा. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सावंतवाडी राजवाडा येथे कै राणी सत्वशीला देवी भोसले आणि तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या नातेसंबंधांमुळे जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी निवेदन देऊन महाराष्ट्रात 2011 2012 साली ही योजना महाराष्ट्रातील केवळ 8 जिल्ह्यांना सुरू होती ही महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यांना सुरु व्हावी अशी आग्रही मागणी करून उर्वरित 28 जिल्ह्यांना मुख्यमंत्र्यांकडून मिळवुन घेतली.
तत्कालीन मुख्यमंत्री या पृथ्वीराज चव्हाण यांनी राजु मसुरकर यांच्या मागणीनुसार संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ही योजना मा पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजूर करून दिली. होती.
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व राणी सत्वशिला देवी भोसले यांना ही योजना मंजूर करण्याचे श्रेय जाते असे भावपूर्वक उद्गार जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी काढले.
या योजनेमुळे दरवर्षी दीड लाख रुपये रेशनधार कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळतो.
यावेळी मंगेश तळवणेकर माजी आरोग्य सभापती रक्तदाते संघटनेचे अध्यक्ष दैव्या सूर्याजी डॉ. राहुल चौगुले .मा. मदन गोरे मार्केटिंग हेड यांनी मनोगत व्यक्त केले.