रत्नागिरी येथील लेखिका कवयित्री सौ.ममता आंबर्डेकर यांची स्त्रीच्या जीवनावर भाष्य करणारी अप्रतिम काव्यरचना
चूल मुल सावरुनी,
सारे जग पार केले ,
विश्वाच्याही पलिकडे,
स्वतःसाठी घर केले ।।1।।
मर्यादांची बंधने ती,
तिने नष्ट केली सारी,
स्वाभिमान निष्टावंत,
असे आजचिच नारी।।2।।
झाशी राणी व जिजाऊ,
इतिहासाची या साक्ष,
शिवरायांच्या पाठीशी,
जिजाऊ त्या होत्या दक्ष ।।3।।
गरिबांच्या गरिबीशी ,
ज्यांची जोडलेली नाळ,
अशा गरिबांच्या माता,
सिंधुताई सपकाळ ।।4।।
गोड गळ्याचे ते रत्न ,
नाव त्याचे लता दीदी,
त्यांची ओळख आवाज,
जरी रहाणी ती साधी ।।5।।
अशा साऱ्या क्षेत्रांमधे,
श्रेष्ठ असे ती हो नारी,
जगा घेऊनी कवेत,
तीच फिरते माघारी ।।6।।
पंख पसरुनी मुक्त ,
घेई आकाशी भरारी,
जिचे जगी या वर्चस्व,
असे आजचीच नारी ।।7।।
सौ. ममता प्रमोद आंबर्डेकर
रत्नागिरी