जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारित ज्येष्ठ लेखक कवी प्रो.डॉ.जी आर उर्फ प्रवीण जोशी यांचा अप्रतिम लेख
अनादी अनंत चार युगे उलटली
महिला आहे , म्हणुन च जग आहे. हे खरं आहे , जगाला आजच का सजगता आली , स्त्री केव्हा पासुन पूजनीय वाटु लागली . पुर्वी ती पूजनीय नव्हती का ? चाली रूढी परंपरा ही तर भारतीय संस्कृती . विसरलात का ! मग आजच नारी चा नारीशक्ती चा डांगोरा पिटण्या त , कुठला पुरुषार्थ (स्रीअर्थ ) आला बुवा ?
पाश्चात्य संस्कृती चे अंध अनुकरण का ? पूर्वी इतकी स्त्री पुज्यनिय आता आहे असं वाटत नाही का ? बिलकुल नाही पूर्वी जेवढी स्त्री पुजनिय होती , तेवढी आता नाही ! होय मी ह्या विधानाचा समर्थन करतोय .
यात्र नार्यस्तु पुज्यन्नते तत्र
रमंते —– ह्या विधानात सर्व काही आले , व ते खरे केले . पुरुष प्रधान संस्कृती च आत्ता ज्यास्त फोफावली आहे हे लक्ष्यात ठेवा . बस म्हटले की बसणारी उठ म्हटले की उठणारी स्त्री म्हणजे हातातील खेळणं आहे असं वाटत काय ?
हल्ली काळा नुसार सोई सुविधांचा वापर करणे इष्ट च , कारण ती गरज आहे , गरज शोधाची जननी ! काळ बदलला नारी घरा बाहेर पडली कारण परिस्थिती च तशी चालुन आली . एकाच्या कमाई वर भागात नाही म्हणुन , प्रत्येक क्षेत्रात ती उतरली . व ते साध्य साधन करून दाखवत , ती सामोर गेली व उभी राहिली . ती साक्षर झाली , मिळवती झाली , अर्थ कारण हा पुरुषर्थ तिने सहज साध्य केला . असजरी असलं तरी तिच्या मागचा चुल मुलं बाळंतपण पाळणा ह्या गोष्टी
परत आल्याच व त्या पण साध्य केल्या , हे त्रिवार सत्य !
पुर्वीच्या काळात ही परिस्थिती ला अनुसरून महिलांनी घर खर्चाला आधार कैक पटीने ज्यास्त दिला ! आठवा त्या गोष्टी गिरणी नव्हती हाताने दळण कांड
च काय ? घरातील जनावरांचा पालन पोषण , गाय म्हैस बकरी इत्यादी च धारा चारा पाणी , इत्यादी करून दुध दुभत त्या विकुन घरार्थ चालवीत अजुनी खेड्यात ही प्रथा चालु आहेच . जोडीला शेती काण्यात पण स्त्रिया मागे नव्हत्या च !
मथुरा असो की द्वारका तिथं पण हे वरील सर्व व्यवहार सुरळीत चालु होते च की , नुसतं गौळण श्रीकृष्ण राधा , रासक्रीडा काव्यात जे मांडतो ते , तिथं अस्तित्वात होतच ना ? कपोलकल्पित गोष्टी नाहीतच ह्या . स्त्रीया पुरुषा बरोबरीने अंग मेहनत करत त्या अर्थार्जन करत होत्या !!!
लग्न झालेली नवं वधु तिचे आगमन , तिच्या हाताचे पायाचे कुंकवाचे ठसे , जोडीने केलेली पुजा असो वा कुलदैवत दर्शन असो तिचे
मंगळागौर असो किंवा डोहाळ जेवण
इत्यादि गोष्टी ह्या , स्त्री जन्माला आलेला मान पानच , किंवा गौरव च होत ना ! प्रत्येक गोष्टीत तिचा पुढाकार हा महिला दिन च होता ना !
सावित्री , रमा जिजाऊ , कित्तूर राणी चनांमा , झाशीची राणी ह्या सर्व
लढाऊ बाण्याची प्रतीक च होती ना ?
काळ बदलला आस्थापना कार्यशैली बदलली . युग नवं प्रवर्तन घेऊन नवं कार्याचा भाग पण बदलला
तरी स्त्री आजुनी खम्बीर आहे . कामाचा व्याप क्षेत्र बदलले . पूर्वीपेक्षा अत्याचार बलात्कार गर्भपात मात्र दिवसा गणिक वाढते आहे ! पूर्वी पेक्ष्या नारी सुरक्षित नाहीं
कारण स्पष्ट च , चित्रपट टेली व्हिजन येणाऱ्या मालिका , चंगळवाद
यांनी मनोवृत्ती बिघडली आहे .
महिला दिनाच्या निमित्ताने नारी संघटित होऊ पाहत आहे , पूर्वीही संघटीत होत्या नाही असे नाही तरीपण आज मात्र ही काळाची गरज आहे !
प्रो डॉ जी आर प्रविण जोशी
अंकली बेळगाव