जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ कवयित्री लेखिका भारती रायबागकर यांची अप्रतिम काव्यरचना
माह्या श्येजारनी गरबडीनं
आल्या मले पुसायला
श्येल लागलाय म्हने तिकडं
येतेस का वं साडी घ्यायला
येकावर येक फ्री हाये
चाल ना वं झटपट
सर्वा माल खपून जाईल
माय, आटोप ना वं पटापट
म्या म्हनलं आयका माहं
हिथं दिडकी न्हाई खायाला
आन् तुम्ही ईच्चारता बायांनो
रंगे, चाल नं बाजाराला
अवं, कायजी कायला करते
आमी देतो ना उधार
(निच्चितीनं दे जो मंग)
तुह्या सख्ख्या मैतरणी हाओत
मंग कायले होते बेजार
मले भी भल्ला लोभ सुटला
गेले जल्दीनं त्यांच्याय संग
पाच-धा साड्या घेतल्यान्
निवडुन डार्र्क डार्र्क रंग
आरशासंबुर इतरून इतरून झ्याक
रोज नेसल्या येक येक
पाण्यात घातल्याबरूबर…
(अरे माझ्या कर्मा)
झाल्यान् पांढऱ्या फेक
ह्या भवान्यांचं आयकुनशान्
माहे (उधारीचे) पैश्ये गेले पान्यांत
(म्हनुनच तर म्हंतात)
आपल्याच मनचं करावं
नायतर निगतो दीड शान्यांत
सौ.भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
(पुणे)