विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण
इचलकरंजी येथे शिव छत्रपती खो – खो क्रीडा संघाच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या
दोन दिवसीय जिल्हास्तरीय १४ वर्षांखालील गटातील मुलांच्या खो – खो स्पर्धेत इलेव्हन संघाने प्रथम क्रमांक पटकावला.विजेत्या संघांना कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे संचालक स्वप्नील आवाडे व विविध मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ संघाचे कार्यकुशल आमदार प्रकाश आवाडे यांनी विविध खेळांच्या प्रचार व प्रसारासाठी सातत्याने विविध स्वरुपात मदतीचा प्रयत्न सुरु ठेवला आहे.त्यामुळेच खेळाडूंना अधिक प्रोत्साहन मिळत असल्याने खेळाडू व क्रीडाप्रेमींच्या मनात त्यांच्या कार्यकुशलतेबद्दल मोठी आदराची भावना आहे.याच भावनेतून इचलकरंजी शहरातील शिव छञपती खो – खो क्रीडा संघाच्या वतीने
आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक १९ मार्च व रविवार दिनांक २० मार्च अशा दोन दिवसीय जिल्हास्तरीय १४ वर्षांखालील गटातील मुलांच्या खो – खो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेचे उद्घाटन कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे संचालक शैलेश गोरे यांच्या हस्ते तसेच प्रतिष्ठित नागरिक चंद्रकांत कोपार्डे ,शिव छत्रपती खो-खो
क्रीडा संघाचे कार्याध्यक्ष अशोक कुकडे ,प्रितम चौगुले यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.या स्पर्धेत ८ संघ सहभागी होवून त्यांच्यामध्ये अत्यंत चुरशीने सामने झाले.या स्पर्धा पाहण्यासाठी इचलकरंजी शहर परिसरातील खेळाडू व क्रीडा शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.सहभागी संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करण्यासाठी उत्कृष्ट खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या स्पर्धा पाहण्यासाठी इचलकरंजी शहर परिसरातील खेळाडू व क्रीडा शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.अखेर या स्पर्धेत
इलेव्हन संघाने प्रथम , सरस्वती संघाने व्दितीय ,शिव छत्रपती संघाने तृतीय व जयहिंद संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला.या विजेत्या संघांना अनुक्रमे प्रथम क्रमांक ३००१ रुपये व चषक ,व्दितीय क्रमांक २००१ रुपये व चषक , तृतीय १००१ रुपये व चषक आणि चतुर्थ क्रमांक १००१ रुपये बक्षीस तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे संचालक स्वप्नील आवाडे , सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बचाटे ,अक्षय मालपाणी , अनिकेत पाटील , गजानन लोंढे ,शिव छत्रपती खो-खो क्रीडा संघाचे अध्यक्ष किरण दंडगे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी , विविध क्रीडा संघाचे खेळाडू व क्रीडा शौकिन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून संभाजी बंडगर ,मंदार कुलकर्णी,अण्णा कुंडले ,अक्षय तारदाळे ,मदन शेट्टी , सोमनाथ कोले यांनी काम पाहिले.या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिव छत्रपती खो-खो क्रीडा संघाचे कार्याध्यक्ष अशोक कुकडे,प्रितम चौगुले ,मदन शेट्टी ,स्वप्नील पोळ ,आकाश नायकल ,निलेश जाधव, कल्पेश दंडगे ,
भैय्या इंगवले , अवधूत यादव ,सुदाम साळुंखे यांच्यासह संघाचे पदाधिकारी व खेळाडूंनी अथक परिश्रम घेतले.