जागतिक साहित्य कला व्यक्तीस व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी रामदास अण्णा यांनी जागतिक चिमणी दिवशी विज्ञानाच्या युगात हरवून गेलेली चिमणी एक अनमोल ठेव या विषयावर लिहिलेली अप्रतिम काव्यरचना.
इवल्याशा अंगणात, होता चिमण्यांचा थवा।
चिवचिव आवाजाने, जणू शुद्ध होई हवा।।
भल्या रामाच्या पहारी, भरे चिमण्यांची शाळा।
चार दाणे टिपायला, फांदीवर होई गोळा।।
हराळीच्या गवताने, खोपा चिमणी बांधते।
खोपा टांगून झाडाला, सुखी खोप्यात नांदते।।
माणसाने लोभासाठी, फक्त मनमानी केली।
त्याच्या सुखासाठी साऱ्या, निसर्गाची हानी झाली।।
आता नाही चिवचिवाट, चिमणी दूर गेली उडून ।
तुझ्या अज्ञानापोटी, सगळं काही गेली सोडून।।
आता नाही किलबिल, नाही कोठे चिवचिव।
अशी अमूल्य सृष्टीची, हरवून गेली ठेव।
रामदास आण्णा
७९८७७८६३७३