You are currently viewing इचलकरंजी कलाकार संघाचा जयप्रभा स्टुडिओ बचाव उपोषणाला पाठिंबा

इचलकरंजी कलाकार संघाचा जयप्रभा स्टुडिओ बचाव उपोषणाला पाठिंबा

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी कलाकार संघाच्या वतीने
कोल्हापुरात जयप्रभा स्टुडिओ वाचलाच पाहिजे ,यासाठी सुरु असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नुकताच इचलकरंजी ते कोल्हापूर अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली.या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या कलाकारांनी
घोषणा देत जयप्रभा स्टुडिओ याठिकाणी सुरु असलेल्या बेमुदत उपोषस्थळी भेट देवून उपोषणाला जाहिर पाठिंबा दर्शवला.तसेच काही कलाकारांनी पथनाट्य सादर करत जयप्रभा स्टुडिओ वाचलाच पाहिजे ,असा संदेश दिला.

कोल्हापूर ही कलानगरी म्हणून केवळ देशातच नव्हेतर जगभरात ओळखली जाते.
कोल्हापूरातील जयप्रभा स्टुडिओ म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास व कोल्हापूरची अस्मिता म्हणून ओळखली जाते. मराठी चित्रपटसृष्टीचे युगपुरुष भालजी पेंढारकर यांच्याकडून लता मंगेशकर यांनी जुन्या काळात हा स्टुडिओ नाममात्र किंमतीत चित्रीकरणाच्या अटींवर खरेदी केला होता. माञ , काही काळानंतर त्यांनी तो स्टुडिओ
परस्पर राजकीय नेत्यांच्या मुलांना व बिल्डरांना विक्री केला.काही वर्षांपूर्वी या स्टुडिओचे अस्तित्व संपवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.माञ ,कोल्हापूरची अस्मिता असलेल्या या स्टुडिओचे अस्तित्व अबाधित रहावे यासाठी
कलाकारांबरोबरच कलाक्षेञाशी निगडीत असलेल्या मंडळींनी एकजूट होत
तीव्र संघर्ष सुरु ठेवला आहे.जयप्रभा स्टुडिओ वाचलाच पाहिजे ,या मागणीसाठी कलाकारांनी स्टुडिओ परिसरात बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे.
या उपोषणाचाच एक भाग म्हणून इचलकरंजी कलाकार
संघाच्या वतीने सकाळी शहरातील
घोरपडे नाट्यगृह येथून मोटारसायकल रॅली काढून ती
कोल्हापूरातील
जयप्रभा स्टुडिओ याठिकाणी आणण्यात आली.तसेच रॅलीत सहभागी झालेल्या कलाकारांनी अत्यंत शांततेत वाचला पाहिजे ,वाचला पाहिजे जयप्रभा स्टुडिओ वाचला पाहिजे अशा घोषणा देत जयप्रभा स्टुडिओ बचाव बेमुदत साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवला.यावेळी काही कलाकारांनी पथनाट्य सादर करत जयप्रभा स्टुडिओ वाचलाच पाहिजे,असा संदेश दिला.या रॅलीमध्ये ज्येष्ठ कलाकारांसह महिला व बाल कलाकार देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा