You are currently viewing एक सूचना

एक सूचना

नंदुरबार येथील ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुनंदा भावसार यांनी चिमणी दिवसानिमित्त लिहिलेली अप्रतिम काव्यरचना

एक सूचना 🐤

अता अंगणी येतच नाही
चिमणी इवली चिवचिवणारी
चिऊकाऊची आठवण येऊन
एक पिढी ही हळहळणारी

झाड कुणीही लावत नाही
पाने नाहीत सळसळणारी
नवी संस्कृती बहरत आहे
बंद घरातून वावरणारी

अंगण गेले झाड हरवले
घरटी ती तर दूsssर राहिली
वर्षामागून वर्षे गेलीत
कधी बरे मी चिऊ पाहिली?

फिरुनी चिमण्या येण्यासाठी
लावा झाडे,ठेवा पाणी
इवली चिमणी हवी अंगणी
हवी तिचीही चिवचीव गाणी

घराघरातून इतुके द्यावे
म्हणतील पिले गोजिरवाणी
*”खूप नको रे – झाड एक ते*…
*थोडे दाणे …थोडे पाणी!”*

अंगणी आता येतच नाही
चिमणी इवली गोजिरवाणी
ही तर आहे एक सूचना…
मानवजातीस चेतविणारी…

©®सौ.सुनंदा सुहास भावसार,नंदुरबार
90963 49241

.

प्रतिक्रिया व्यक्त करा