जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य निवृत्त पोलीस अधिकारी वासुदेव खोपडे यांची रंगपंचमी निमित्त लिहिलेली काव्यरचना
गट गटा गटा पेली भांग
हारपली माही सूदबुध
एल्हावत साई म्हणे दाजी
पेन्ना गरम सायीच दूध !!
वर खाली गोल फिरो
साई करे डिंग डाँग
माहया पुढे दिसे मले
ऊभी अप्सराईची रांग !!
मांग पुढे फिरत माहया
मनत हुकुम मेरे आका
घरवाली मने बाबू गेला
आता कामातून तुहया काका !!
हासत होतो नाचत होतो
बदलून गेला रूपनक्षा
साई मने दाजी आंगात
घुसला कायहो लक्ष्या !!
गोड धोड खात होतो
मांगत होतो पुरणाची पोई
न्हाई न्हाई मनत राज्या
खेयलो साई संग होई !!
गरम गरम दूध पिऊन
भाऊ पोयले माहे होट
पन कयलि न्हाई कोनालेच
राज्या माहया पोटातली गोठ !!
दूध असते एकच भाऊ
असतात त्याचे बहू रूपं
जीव गुंफला रे नात्यात
बहू प्रेम वात्सल्याचे रूपं !!
साई अरधी घरवाली
असते दुधावर्ची साय
पत्नी असते क्षणाचीच
असते आयुष्याची माय !!
असते आयुष्याची माय !!
वासुदेव म खोपड़े
सहा पोलीस उप निरीक्षक(सेनी)
अकोला 9923488556