You are currently viewing अनागोंदी कारभाराची होळी

अनागोंदी कारभाराची होळी

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश आंदोलन प.महाराष्ट्र उपाध्यक्ष, तथा माहिती अधिकार नियोजन समिती संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख

होलिका दहन हा हिंदूंचा एक महत्त्वाचा सण आहे, ज्यामध्ये होळीच्या एक दिवस आधी म्हणजेच होलिका दहनाच्या पूर्वसंध्येला प्रतीकात्मकरित्या केले जाते. वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण म्हणून होलिका दहन साजरा केला जातो.
हिरण्यकशिपूचा ज्येष्ठ पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा मोठा भक्त होता. वडिलांनी लाख सांगूनही प्रल्हाद विष्णूची पूजा करत राहिला. राक्षसाचा पुत्र असूनही, नारद मुनींच्या शिक्षणामुळे प्रल्हाद नारायणाचा महान भक्त बनला. असुराधिपती हिरण्यकश्यपनेही आपल्या मुलाला मारण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला, परंतु भगवान नारायण स्वतः त्याचे रक्षण करत राहिले आणि त्याचा केसही उपटला नाही. असुर राजाची बहीण होलिका हिला भगवान शंकराकडून अशी चादर मिळाली होती की ती धारण केल्यावर अग्नी तिला जाळू शकत नाही. होलिकाने ती चादर पांघरली आणि प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन चितेवर बसली. नशिबाने ती चादर प्रल्हादच्या अंगावर उडून प्रल्हादचा जीव वाचला आणि होलिका दगावली. अशा प्रकारे, इतर अनेक हिंदू सणांप्रमाणे, होलिका दहन देखील वाईटावर चांगले प्रतीक आहे.
पुराण कथांमध्ये आपणास एवढेच सांगितले जाते की होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय असा होतो. आज आपणांस वाईट विचार. वाईट आचार. वाईट निती. वाईट चालीरिती. वाईट सवयी. वातावरण दुषित करणारे घटक. खोटे बोलू नका. कोणालाही फसवू नका. दहशतवाद नक्षलवाद. जातीयवाद. अपहरण. अशा एक नाही अनेक गोष्टींची आज आपणांस होळी करण्याची गरज आहे
आज शासकीय निमशासकीय कार्यालयात चालणारे सर्व अनागोंदी कारभार याची सुध्दा आज आपण भारताचे पहिले नागरिक म्हणून आजच होळीच्या मुहूर्तावर निश्चिय करा आपण सर्व अनागोंदी कारभाराची होळी करण्याची. शपथ घ्या.
बांधकाम कामगार यांनी आपणांस बांधकाम कामगार नोद घालतो. लाभ मिळवून देतो. या योजनेसाठी एवढा खर्च. जी योजना सुरू नाही त्यासाठी बांधकाम कामगार यांची फसवणूक करणारे एजंट. संघटना सेवाभावी संस्था युनियन यांच्याकडून फसवणूक होणार नाही करुन घेणार नाही. कामापेक्षा पैसे मागणारे यांची जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार करा आणि या सर्व अनागोंदी फसवणूक कारभाराला आजपासून होळी करण्याचा निर्णय बांधकाम कामगार यांनी घेणे गरजेचे आहे
सर्वात महत्वाचे आणि आपणांस जगण्यास कारणीभूत असणारा मुद्दा म्हणजे रेशन अन्न धान्य मुद्दा सर्वांना स्वच्छ व निवडक रास्त आणि स्वस्त दरात मापक अन्न धान्य मिळण्यासाठी रेशन ही संकल्पना अमलात आणली. रेशन दुकानदार चोर रेशन आलं नाही. रेशन संपलं आहे. तुमचं नाव दिसत नाही. थम उठत नाही. आधार लिंक नाही. रेशनकार्ड वर नमूद व्यक्ति पेक्षा कमी अन्न धान्य वितरण. अश्या एक नाही अनेक गोष्टींची आज होळी करण्याची गरज आहे. या रेशन दुकानदार पेक्षा मोठे चोर आहेत ते म्हणजे पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी कारणं रेशन हक्क सनदेनुसार कोणता अर्ज दाखल केल्यावर किती दिवसांत त्याचा निर्णय घेतला पाहिजे हे लिहून ठेवले आहे तरी पण आज पुरवठा विभागात हजारों नविन रेशनकार्ड काढणे. फाटके खराब झालेले रेशनकार्ड बदलणे. नाव वाढविणे. नाव कमी करणे. अन्न सुरक्षा योजनेत सहभागी. रेशनकार्ड ट्रान्स्फर करणे. अशा विविध अर्जावरील आजपर्यंत पुरवठा विभागात धुळ सुध्दा उठली नाही कारणं कोणतेही प्रकरण विना पैशाचे निकालात निघत नाही आणि काढलं जात नाही. म्हणजे सर्वसामान्य माणसाला गोरगरीब जनतेला हेलपाटे मारुन आपला वेळ आणि पैसा वाया घालवावा लागत आहे. म्हणजे आजच होळीच्या दिवशी शपथ घ्या आणि अशा सर्व अनागोंदी कारभाराची होळी करण्याची गरज आहे
गोरगरीब जनता सर्वसामान्य लोक. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा. बेरोजगारी कमी व्हावी यासाठी विविध धर्मातील तरूण मुलांसाठी एक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. आण्णासाहेब पाटील विकास महामंडळ. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ. महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ. डॉ बाबासाहेब आंबेडकर आर्थिक विकास महामंडळ. महिला बचत गट. जिल्हा परिषदेकडून चालविणाऱ्या जाणारया विविध विकास योजना. अशा एक ना अनेक योजना आहेत पण त्या फक्त आणि फक्त कागदावरच खरोखरच गरज असणारे यांना याचा कोणताही फायदा होत नाही. याला कारणीभूत आहेत ते म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रीय कृत असणार्या बॅंका आहेत या बॅंका आर्थिक विकास महामंडळ यांचेकडून येणारा कोट्यवधी रुपयांचा निधी गरजूंना न देता यांच्याकडूनच कर्ज वाटप केले जाते आणि एखादे प्रकरण बॅंकेत असेलतर त्या कर्जदार याला हेलपाटे मारून बेजार करतात. आणि जर कर्ज मंजूर झालतर बॅंक अधिकारी व कर्मचारी यांना टक्केवारी द्यावी लागते. म्हणजे पैसा शासनाचा. वरकमाई करतात ते बॅंक अधिकारी व कर्मचारी आणि व्याज भरतो तो गोरगरीब. यालाच म्हणतात प्रसंगावधान. म्हणजे आजच शपथ घेऊन या सर्व अनागोंदी कारभाराची होळी करण्याची गरज आहे आणि करावीच लागणार आहे. नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांच्या बगलबच्चे यांची कोट्यवधी रुपयांची कर्जे मंजूर होतात आणि ती परतफेड सुध्दा केली जात नाही त्यावेळी हेच अधिकारी आणि कर्मचारी वसुली साठी जाण्याचे धाडस सुध्दा होत नाही अस का. होळी झालीच पाहिजे
सर्वसामान्य माणसाला शासकीय निमशासकीय कार्यालयात चालणार्या कामकाजाची माहिती तपासणी पडताळणी करण्याचा अधिकार आपणांस माहीती अधिकार कायद्याने दिला आहे. पण आज उलट झाल आहे. आपणांस एखादी माहिती हवी असल्यास आपण सदर विषय धरून माहिती अधिकार दाखल करतो म्हणजे पहिला अर्ज दाखल करतो त्यानुसार संबंधित विभागाला ३० दिवसांचा कालावधी मिळतो त्या वेळेत सदर माहिती कार्यकर्त्याला देणें बंधनकारक आहे पण आज उलट झाल आहे. जनमाहीती अधिकार अधिकारी व कर्मचारी यांना माहिती अधिकार कायद्याचे कसलही गांभीर्य राहील नाही. ३० दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी कसलाही माहिती अधिकार दाखल करणारे यांना दिली जात नाही. माहिती उपलब्ध आहे किंवा नाही हे सुध्दा कळविले जात नाही म्हणजे यांना माहीती अधिकार कायद्याबद्दल कोणतेही गांभीर्य नाही आपला पगार मिळाला कि बस म्हणजे अशा अनागोंदी कारभाराची होळी करण्याची गरज आहे
आज आपण रोज वृतमानपत्रात दूरदर्शन वर पाहतो वाचतो बघतो असा कोणताच दिवस जातं की त्यादिवशी महिला अत्याचार विषयी बातमी नाही. म्हणजे सामुहिक बलात्कार. अपहरण. अल्पवयीन मुलीवर अत्याचार. छेडछाड. दुरदरशन वर. पेपर मध्ये. अत्याचार करणारे हिरो असल्या सारखे वृतमानपत्रात दुरदर्शन वर दाखविले जातात. आणि अत्याचार पिढीत महिलांचे उद उद करतात या विचारांची अशा वागण्याची होळी करण्याची गरज आहे. अत्याचार पिढीत महिलांनी तक्रार करायला गेल्यावर त्यांची तक्रार दाखल करुन घेणारे पोलिस कर्मचारी यांच्या अनागोंदी कारभाराची होळी करण्याची गरज आहे.
भ्रष्टाचार हा सर्वात मोठा शाप आहे कारणं आज कोणत्याही शासकीय निमशासकीय कार्यालयात आपले काम लवकरात लवकर करुन घेण्यासाठी आपणांस आर्थिक लाच टेबल खालून द्यावी लागते. नोकरी साठी लाच. घरकुल साठी लाच. बांधकाम कामगार नोंदणी साठी लाच. वयोवृद्ध नागरिक यांना पेन्शन मिळविण्यासाठी लाच. बॅंक कर्ज घेण्यासाठी बॅंक अधिकारी व कर्मचारी यांना द्यावी लागणारी लाच. घरफाळा पाणीपट्टी कमी करण्यासाठी लाच. आठवडा बाजारात माल विक्री करण्यासाठी नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांना द्यावी लागणारी लाच. गाडी अडवणे. कागदपत्रे नाहीत म्हणून लाइन्स नाही म्हणून अशा वाहनाशी निगडित असणारे नियम यासाठी पोलिसांना द्यावी लागणारी लाच. कोर्टात केस जिंकण्यासाठी वकिलांना दिली जाणारी लाच. शाळेत शिक्षण घेण्यासाठी दिली जाणारी लाच. पास होण्यासाठी शिक्षकांना दिली जाणारी लाच. ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका तहसिलदार कार्यालय पंचायत समिती जिल्हा परिषद महसूल विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग महिला व बालकल्याण समिती अपंग विकास महामंडळ. अशा एक ना अनेक ठिकाणी आज भ्रष्टाचाराचा विळखा गोरगरीब लोकांचा गळा आवळत आहे. यातील भ्रष्टाचाराची होळी करण्याची गरज आहे त्यासाठी आपणांस कंबर कसावी लागणार आहे.
आपल्यावर राज्य करण्याचा अधिकार आपण आपल्या अनमोल मताचा वापर करून निवडून दिलेले मुठभर करतात त्यासाठी आपणच कारणीभूत आहोत कारणं आपणांस निवडणूक काळात. मताची किंमत काडीमात्र दिली जाते आणि आपण गुलाम होतो. जेवन दारू यासाठी आपण आपला ईमान विकतो. जातीयवाद. दहशतवाद नक्षलवाद. टोळीयुद्ध गुंडगिरी. याचा वापर निवडणूक जिंकण्यासाठी केला जातो आणि हे करणारे हे सर्व पांढरं कावळ आहेत. आपण गुलामच आहोत आणि या सर्व विचारांची आजच होळी नाही केली तर येणारी पिढी सुध्दा गुलामच होणार. आपल्यातील कोणीही पोलिस नाही. तहसिलदार नाही. नायब तहसीलदार नाही. प्रांत नाही. जिल्हा परिषद. पंचायत समिती. व सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात गोरगरीब चालतं नाही कारण गोरगरीब जनतेकडे ज्ञान आहे पण वशिला पैसा नाही आजच अशा घातक विचारांची होळी करण्याची गरज आहे मतदानावर बहिष्कार टाका. निवडणूक लढविणाराकडे पैसा किती आहे त्यापेक्षा त्याकडे जनकल्याण करण्याची कला आहे का गुण आहे का
होळी दिवशी कचरा गोळा करुन त्यांचे दहन करा. आपला परिसर स्वच्छ ठेवा. होळी येताना वातावरणात बदल होत असतो त्यावेळी वातावरणाचा समतोल राखण्यासाठी होळी मुळे सर्व वातावरण उष्ण केले जाते त्यामुळे वातावरणातील बदलांचा मानवी शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. हा निसर्ग नियम आहे. मनातील विष रुपी कचरा जाळण्याची आज आपणांस गरज आहे
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा