रत्नागिरी येथील लेखिका कवयित्री ममता बांबर्डेकर यांची रंगपंचमी निमित्त लिहिलेली अप्रतिम काव्यरचना
सप्तरंगातले प्रेम,
चला रंगुनिया जाऊ,
प्रेमानेच प्रेमाचे या,
गोड गीत चला गाऊ ।।1।।
सप्तरंगी जीवनाचा,
किती निखळ आनंद,
करी दुःखाच्याच वाटा,
हळुवार तेच बंद ।।2।।
सप्तरंगी जीवनाचे,
किती गाणे असे गोड,
हृदयाला लावतसे,
एका हृदयाची ओढ ।।3।।
इंद्रधनू हे प्रेमाचे,
काळजात जपू चला,
प्रेम जीवनाचा आता,
उंच उंच जाई झुला ।।4।।
ममता आंबर्डेकर
रत्नागिरी