जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची रंगपंचमी साजरी करणारी अप्रतिम काव्यरचना
सात रंग शाळेतच शिकलो
ता ना पी ही नी पा जा
मग आयुष्याने पुढे शिकविला
रंग आठवा प्रितिचा
रंग पंचमि आयुष्याचि
शिकवुन गेली कांहि तरी
रंग पाहिले ढंग पाहिले
सत्संग ही घडला कधी तरी
ता शिकवी ताबाच मनावर
ना सांगे ना गर्व धरी
पी म्हणतो पीडा न करी
ही सांगे हित पहा तरी
नी शिकवी निर्व्याज प्रेम
पा वदे पाप तू दूर करी
जा सांगे जागृती सदॆवच
जा आयुष्यात हे रंग भरी
नव रंगानी न्हाते पृथ्वी
रंग नवा नववा कुठचा?
एक रंग ही नसे ज्यास
त्या सर्व रंगी श्रीरंगाचा
अरविंद