इचलकरंजी येथे शिवछत्रपती खो – खो क्रीडा संघाच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक १९ व रविवार दिनांक २० अशा दोन दिवसीय जिल्हास्तरीय १४ वर्षांखालील गटातील मुलांच्या खो – खो स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती संघाचे कार्याध्यक्ष अशोक कुकडे यांनी दिली.तसेच या स्पर्धा छञपती खो – खो क्रीडा संघाच्या मैदानावर होणार असून या स्पर्धेची जय्यत तयारी पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ संघाचे कार्यकुशल आमदार प्रकाश आवाडे यांनी जनतेच्या मुलभूत विकासकामे पूर्ण करण्यावर सातत्याने भर दिला आहे.याशिवाय विविध खेळांच्या विकासाबरोबरच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न सुरु ठेवला आहे.त्यामुळेच खेळाडू व क्रीडाप्रेमींच्या मनात त्यांच्या मनात मोठी आदराची भावना आहे.याच भावनेतून इचलकरंजी शहरातील छञपती खो – खो क्रीडा संघाच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक १९ मार्च व रविवार दिनांक २० मार्च अशा दोन दिवसीय जिल्हास्तरीय १४ वर्षांखालील गटातील मुलांच्या खो – खो स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.छञपती खो – खो क्रीडा संघाच्या मैदानावर होणा-या या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी सकाळी विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या स्पर्धेमध्ये निमंञित ८ संघ सहभागी होणार आहेत.तसेच विजेत्या संघांना प्रथम क्रमांक ३००१ रुपये व चषक ,व्दितीय क्रमांक २००१ रुपये व चषक , तृतीय १००१ रुपये व चषक आणि चतुर्थ क्रमांक १००१ रुपये तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षीस देवून गौरवण्यात येणार आहे.दोन दिवसीय या खो – खो स्पर्धेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.
या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी छञपती खो – खो क्रीडा संघाचे अध्यक्ष किरण दंडगे ,प्रितम चौगुले ,मदन शेट्टी यांच्यासह खेळाडू अथक परिश्रम घेत असून या स्पर्धेचा सर्व खेळाडू व क्रीडा प्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन संघाचे कार्याध्यक्ष अशोक कुकडे यांनी केले आहे.