आम्ही बालकवी संस्था, सिंधुदुर्गच्या सदस्या सौ वंदना नाईक यांनी होळी सणाच्या निमित्ताने लिहिलेली काव्यरचना
आली रे होळी आली
तनमन माझे डोलू लागले
स्पर्श साजणाचा झाला
शामरंगात मी नाहले…..
आनंदाने आज माखले
होळीच्या या गं रंगात
मन बावरले सखे बाई
विविध रंगी या ढंगात…..
धुंदी भिरभिरे नयनावर
आगळी नशा चढली
सप्तरंगात या होळीच्या
ह्रदयी माझ्या तार छेडली….
देहभान विसरले आज
एकमेकांना रंगवताना
राधा तर झाली कान्हाची
साज रंगाचे चढवताना…..
रंग लावले तनामनाला
उधळण केली रंगांची
आवेग दाटला श्वासात
रंगत चढली खेळाची….
उत्साह वाढला खेळताना
सजणीच्या प्रेमात साजन रंगला
मोरपिसी पिसारा तनूवरी
जादूई रंगांनी अलगद खुलला…..
वसुधा नाईक,पुणे