You are currently viewing होई रे होई

होई रे होई

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य माजी पोलीस अधिकारी वासुदेवराव खोपडे यांची होळी सणाच्या निमित्ताने लिहिलेली काव्यरचना.

आम्बट गोड़ चिचोनी
संग पुरणाची पोई
शिंमग्याची बोम्ब मारा
होई रे होई————— !
सायबाच्या म्याडमची
तंग प्याण्ड अन चोई
सायबाच्या नावान
होई रे होई ————— !
भ्रष्ट लोकाच्या गयात
बांधा रे भीकेची झोई
भ्रष्टाचारयाच्या नावान
होई रे होई—————— !
चुगलखोर चमचे जे
लावतात लावलगाई
चमच्यायच्या नावान
होई रे होई————— !
जनतेलाच लुटून
जे खातात तूपपोई
देशद्रोह्यांच्या नावान
होई रे होई——————- !
दृष्टांचाच नाश करा
दृष्ट विचारांची होई
शीमग्याची बोम्ब मारा
होई रे होई

—————- !
वासुदेव म खोपड़े
सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
अकोला 9923488556

प्रतिक्रिया व्यक्त करा