You are currently viewing कुडाळ मनसे तालुकाध्यक्षपदी प्रसाद गावडे कायम – परशुराम उपरकर

कुडाळ मनसे तालुकाध्यक्षपदी प्रसाद गावडे कायम – परशुराम उपरकर

शिवजयंतीनिमित्त मनसेची भव्य रॅली,पाडवा मेळाव्याचे आयोजन…

कणकवली

मनसेच्या कोणाचेही पद गोठविण्याचा अधिकार हा केवळ पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनाच आहे. त्याचा निर्णय कोणीही पदाधिकारी स्थानिक पातळीवर घेऊ शकत नाही. त्यामुळे कुडाळ तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी प्रसाद गावडे यांच्याकडे राहणार आहे, असे स्पष्टीकरण माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज येथे दिले. दरम्यान मनसेच्या माध्यमातून कुडाळ, मालवण, वेंगुर्ला व कणकवली या चार तालुक्यात शिवजयंतीनिमित्त भव्य रॅलीचे आणि पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. येथील मनसेच्या कार्यालयात जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. उपरकर बोलत होते.
यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, दत्ताराम गावकर, शैलेश अंधारी, जिल्हा सचिव बाळा पावसकर, तालुकाध्यक्ष दत्‍ताराम बिरवाडकर, चंदन मेस्त्री, सचिन तावडे, विनोद सांडव, प्रसाद गावडे, सुनील गवस, सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनलेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. उपरकर पुढे म्हणाले, मनसेच्या माध्यमातून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे आजच्या बैठकीत ठरविण्यात आले आहे. तसेच शिवजयंतीनिमित्त कुडाळ, मालवण, वेंगुर्ला, कणकवली या चार तालुक्यात सकाळी मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली ओरोस मुख्यालयापर्यंत काढून मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरातील मूर्तीस हार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. तर २ तारीखचा पाडवा मेळावाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून जिल्ह्यात विविध ठिकाणी स्क्रीन लावून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा