शनिवार दि १२ मार्च २०२२ रोजी रोटरी क्लब हॉल, गुंजमाळ नाशिक येथे आहिरे स्पर्धा परिक्षा अकॅडमी व स्टार न्यूज नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आंतराराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सन्मान सोहळ्यामध्ये सुप्रसिध्द अभिनेत्रि प्रिया सुरते यांच्या शुभ हस्ते वलसाड गुजरात येथील कवियत्री सौ० भाग्यश्री राकेश बागड यांना हिरकणी भूषण काव्य गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून हिंदी व मराठी चित्रपट अभिनेत्री प्रेमा किरण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते..
कवयित्री सौ० भाग्यश्री राकेश बागड यांना मागील महिन्यात राजनंदिनी फाउंडेशन जळगाव ह्या नामांकित संस्थेद्वारे त्यांना साहित्य भूषण काव्य गौरव पुरस्कार प्राप्त झाला… आता पर्यंत भाग्यश्री बागड यांनी २०० ते ३०० चाराक्षरी, षडाक्षरी, अष्टाक्षरी, कविता लिहलेल्या आहे.. विविध विषयात त्यांनी चारोळी लेखन संग्रहित केले आहे..त्यांच्या अशा सुंदर कार्याचा आणि साहित्याचा गौरव होत आहे. महाराष्ट्रामध्ये विविध संमेलनात त्यांचा उत्साहात सहभाग असतो.. त्यांना प्राप्त होणारे यश आणि प्रगती यामध्ये, त्यांचे पतीराज श्री राकेश बागड यांचे त्यांना खूप मोलाचे सहकार्य व प्रेरणा भेटते. महाराष्ट्र आणि गुजरात येथून त्यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे…
सुंदर असे महिला दिनाच्या सोहळ्याचे आयोजन आहिरे अकॅडमी चे संचालक प्रा. डॉ०. आनंद आहिरे व कवी बी. वाय.पगारे (प्रदेशाध्यक्ष – सहकार सेल – रा. काँग्रेस पक्ष), डॉ० रत्नाकर आहिरे, बाळासाहेब गिरी, माणिकराव गोडसे, गोरख पालवे, सुभाष उमरकर, आहिरे, प्रतिक जगताप, दिपाली व हितेशा, ह्या सर्व कवी कवयित्री यांनी खूप मेहनत घेतली आणि कार्यक्रम व संमेलन यशस्वीरित्या पार पाडले.. कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन आशा गोवर्धने यांनी केले…