You are currently viewing आचरा देवूळवाडी येथील स्मशानभूमीची श्रमदानातून साफसफाई

आचरा देवूळवाडी येथील स्मशानभूमीची श्रमदानातून साफसफाई

मालवण

आचरा देवूळवाडी गणपती मंदिरालगतच्या स्मशानभूमीची सोमवारी सकाळी देवूळवाडी, मेस्त्री वाडी,पुजारे वाडी,परडेकर मंडळ,डोंगरेवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून साफसफाई केली,यावेळी या भागातील सुमारे १५० च्या आसपास ग्रामस्थ सहभागी झाले होते.

आचरा देवूळवाडी गणपती मंदिरालगतच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुर्णतः झुडपे आल्याने रस्त्याने जाताना अडथळा येत होता. तसेच मुख्य स्मशानभूमी जागेत अवास्तव वाढलेल्या रानटी झुडपांमुळे हा भाग अडचणींचा बनला होता. याबाबत आचरा देवूळवाडी येथील ग्रामस्थांनी गांगेश्वर मंदिरात बैठक घेऊन सोमवारी १४ मार्चला सकाळी श्रमदानातून स्वच्छता करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार या स्मशानभूमीचा वापरकेला जाणाऱ्या डोंगरेवाडी, मेस्त्री वाडी,परडेकर मंडळ,पुजारे वाडी या भागातील ग्रामस्थांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.

याला प्रतिसाद देत याभागातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला होता.यात आचरा देवूळवाडी येथील सदानंद घाडी, अर्जुन बापर्डेकर, अनिकेत घाडी,ग्रा प सदस्य लवू घाडी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ कपिल मेस्त्री, मंगेश घाडी, अभय भोसले, रविंद्र घाडी,शामसुंदर घाडी, मोहन घाडी,प्रफुल्ल घाडी,चंदू आडवलकर,महेंद्र घाडी,भाऊ घाडी,दिपक घाडी,रूपेश घाडी,गणेश घाडी,नंदकुमार शेवरेकर,चंदू घाडी,संतोष घाडी,यासह घाडी वाडीतील अनेक ग्रामस्थ, डोंगरेवाडी येथील एकनाथ परब,सुहास परब,देसाई, ग्रा प सदस्य राजू परब यांच्या सह अनेक ग्रामस्थ, मेस्त्री वाडी येथील अंकुश मेस्त्री, प्रसाद मेस्त्री, मंगेश मेस्त्री, बाबू मेस्त्री, राजन मेस्त्री यांच्या सह अनेक मेस्त्रीवाडीतील ग्रामस्थ, परडेकर मंडळाचे राणे, मेस्त्री, चव्हाण आदी ग्रामस्थ तसेच पुजारे वाडी येथील पुजारे, पेंडूरकर,शिर्सेकर,आचरेकर यांच्या सह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते. सुमारे अडीच तास चाललेल्या या साफसफाई मोहिमेत झाडाझुडपांनी अडवलेला रस्ता पुर्णतः साफ करण्याबरोबरच स्मशानभूमीभागातील रानटी झुडपे तोडून हा भाग स्वच्छ केला गेला.

प्रतिक्रिया व्यक्त करा