You are currently viewing देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या नोटीसीची कणकवलीत होळी…

देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या नोटीसीची कणकवलीत होळी…

जिल्हा भाजपचे पटवर्धन चौकात आंदोलन; महा विकास आघाडी सरकारचा निषेध…

कणकवली

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारने फडणवीस यांनाच नोटीस बजावली. याचा जिल्हा भाजपतर्फे आम्ही तीव्र निषेध करतो. अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी येथे व्यक्त केली. तसेच फडणवीस यांना पाठविलेल्या नोटिशीच्या प्रतीची कणकवली पटवर्धन चौकात होळी करण्यात आली.
कणकवली पटवर्धन चौकात भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत, पंचायत समिती सदस्य मिलिंद मिस्त्री यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिस प्रशासनाने पाठविलेल्या नोटीस इची होळी करण्यात आली.
तेली म्हणाले की, आघाडी सरकारच्या मंत्र्यांची भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची प्रकरणे बाहेर पडत आहेत. एकामागोमाग एक मंत्री तुरुंगात जात आहेत. त्यांच्या पापाचा घडा भरत आहे. यामुळे आघाडीचे नेते घाबरून गेले आहेत. त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न चालवला आहे. पण त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. महाविकास आघाडीची वाटचाल विनाशाकडे होत आहे.
ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षनेत्याला माहिती मिळवण्याचा विशेषाधिकार असतो. त्यांना माहिती कोठून मिळाली असे विचारता येत नाही. तरीही या सरकारने बेकायदेशीर त्यांना नोटीस पाठवली. हे सरकार वारंवार कायदा धाब्यावर बसवून काम करत आहे. त्यामुळे त्यांना अनेकदा न्यायालयाकडून थपडा खाव्या लागल्या आहेत. अनिल देशमुख, सचिन वाझे, भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन अशा अनेक प्रकरणांत या सरकारला न्यायालयाचे फटके बसले आहेत. तरी सरकार सुधारत नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा