इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथे ए. जे सोशल फौडेशन वेल्फेअर फौंडेशनच्या वतीने व डायनॅमिक मंडळाच्या सहकार्याने जागतिक महिला दिनानिमित्त आज रविवारी डायनॅमिक मंडळाच्या मैदानावर आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय महिलांच्या कबड्डी – स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे ,माजी आमदार उल्हास पाटील , माजी जिल्हा परिषद सदस्य विलास खानविलकर यांच्या प्रमुख हस्ते करण्यात आले.यावेळी
ए. जे सोशल फौडेशन वेल्फेअर फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा अबोली जिगजिनी ,स्पर्धेचे निरीक्षक प्रा.अण्णासाहेब गावडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
आजच्या २१ व्या शतकात महिला आता अबला नसून सबला बनून ती विविध क्षेञाच्या माध्यमातून समाज विकासात मोठे योगदान देत आहे.यामध्ये तिला क्रीडा क्षेञ देखील अपवाद राहिलेले नाही ,हेच पुन्हा एकदा अधोरेखित करण्यासाठी इचलकरंजी शहरातील ए.जे.सोशल वेल्फेअर फौंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्षा अबोली जिगजिनी यांच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनानिमित्त आज रविवारी डायनॅमिक मंडळाच्या मैदानावर जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य डॉ.राहुल आवाडे ,माजी आमदार उल्हास पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य विलास खानविलकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पहिला सामना हुपरीचा शिवशक्ती संघ व इचलकरंजीचा डायनॅमिक संघ यांच्यामध्ये अत्यंत चुरशीने झाला.यामध्ये डायनॅमिक संघाने आपल्या प्रतिस्पर्धी शिवशक्ती संघावर ५ गुणांनी मात करत विजय मिळवला.तसेच दुसरा सामना जांभळी संघ व गंगामाई गर्ल्स हायस्कूल संघ यांच्यामध्ये होवून यामध्ये जांभळी संघ विजयी ठरला.यावेळी डायनॅमिक मंडळाचे अध्यक्ष संजय कुडचे , कार्यवाह प्रा.शेखर शहा ,भूषण शहा , अतुल बुगड , दिलीप शिंदे ,बाळू काकडे ,भाऊ आडसूळे , निखिल गोरे ,वसिम बागवान ,विजय गुरव ,सूरज मुरगुंडे , विकास जित्ती ,जमीर फनीबंध , नामदेव पवार ,विजय जयताळकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील १४ महिला संघ सहभागी झाले होते.या स्पर्धेसाठी डायनॅमिक मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांचे मोठे सहकार्य लाभत आहे.
यावेळी पंच म्हणून प्रकाश मोहिते ,प्रा.कुबेर पाटील ,बाळासो चव्हाण ,अमर नवाळे ,सोनल बाबर , कार्तिक बचाटे ,मनोज मगदूम , काशिनाथ वनमोरे ,ॠषीकेश लोहार यांनी काम पाहिले.या स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडा शौकिनांनी मोठी उपस्थिती लावली होती.