मुंबई पोलिसांच्या सायबर विभागामार्फत फोन टॅपींग प्रकरणी मान.विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली , याचा निषेध म्हणून भाजपा वेंगुर्ले च्या वतीने त्या नोटीसीची होळी करण्यात आली . महाविकास आघाडी सरकारकडून मुद्दामहुन विरोधी पक्षनेत्यांना अडचणीत आणन्यासाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे या कृतीचा निषेध म्हणून *नोटीसीचे दहन* भाजपा च्या वतीने तालुका कार्यालया समोर करण्यात आले .
यापूर्वीही महाविकास आघाडी सरकारने केंद्रीय मंत्री नारायणराव राणे तसेच आमदार नितेशजी राणे यांना सुद्धा खोट्या गुन्ह्यात अडकवून अटकेची कारवाई केली होती . अशाच पध्दतीचे सरकार घोटाळा दाबण्यासाठी खोटी एफ.आय.आर माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वर दाखल केली आहे . म्हणूनच संपुर्ण महाराष्ट्रात या कृतीचा निषेध म्हणून भाजपा च्या वतीने नोटीसीचे दहन करण्यात आले . यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दुमदुमला .
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले , जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर , उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , नगरसेवक प्रशांत आपटे – श्रेया मयेकर , ता.चिटनीस जयंत मोंडकर , युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस , आय. टी.सेलचे केशव नवाथे , महिला मोर्चा च्या व्रुंदा गवंडळकर व रसीका मठकर , ओंकार चव्हाण , वायंगणी उपसरपंच हर्षद साळगांवकर , युवा मोर्चा चे भुषण सारंग , संतोष खानोलकर इत्यादी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी भारतीय जनता पार्टी चा विजय असो , भारत माता की जय , वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या .