आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन
आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण नगरपरिषद हद्दीतील आडारी गणपती मंदिर परिसर विकसित करणे व बैठक व्यवस्था करण्यासाठी ६ लाख ६३ हजार रु निधी मंजूर करण्यात आला आहे.काल या कामाचे भूमिपूजन आ. वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागरिकांनी आ. वैभव नाईक यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले.
याप्रसंगी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगरसेवक मंदार केणी, नगरसेवक यतीन खोत, शहर प्रमुख बाबी जोगी, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर,सामाजिक कार्यकर्ते सुहास वालावलकर,राजू परब,नितीन वाळके, किरण वाळके, युवासेना मालवण शहरप्रमुख मंदार ओरसकर, नगरसेविका आकांशा शिरपुटे, सेजल परब, रश्मी परुळेकर, तपस्वी मयेकर, भाई कासवकर, प्रसाद आडवणकर, नाना गावकर, योगेंद्र गावकर, दिनेश मुंबरकर , आदित्य चव्हाण , राजा मुंबरकर, योगिता गावकर, नम्रता चव्हाण, वर्षा जैतापकर, गौरव कांबळी, ओमकार कामतेकर, चंद्रकांत जैतापकर, सिद्धेश फाटक, रमाकांत फाटक, चंदन कामतेकर, नागेश चव्हाण शमिका गावकर आदी उपस्थित होते.