जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच, गझल मंथन, गझल प्राविण्य आदी ग्रुप च्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ शोभा वागळे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२५ व्या स्मृतिदिन निमित्त लिहिलेला लेख
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले १२५ व्या स्मूती दिन निमित्त.
आज स्त्रीने जे स्थान पटकावले! आज ती ज्या शिखरावर पोचली ह्याचे सारे श्रेय जाते त्या महान पहिल्या वहिल्या स्त्री शिक्षिकेला, वंदनीय थोर सावित्रीबाई फुले ह्यांना.
त्याकाळी अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करून,शेण, दगड, गोटे,व शाब्दिक मारा सहन करून त्यांनी आपला शिक्षकी पेशा चालवला.
त्यांनी स्त्रीला शिक्षित करायचे ठरवले.अबलेची सबला झाली. म्हणूनच,आज आपण साऱ्या स्त्रिया ह्या उंच शिखरावर पोचलो.
अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांच्या स्मुतीदिन निमित्त त्यांना विनम्र अभिवादन, व माझे कोटी कोटी प्रणाम.
सावित्रीबाईचे लग्न अगदी लहान वयातच ज्योतीबा फुलेशी झाले होते. तेव्हा त्या फक् नऊ वर्षाच्या होत्या तर ज्योतीबा बारा वर्षांचे होते. ज्योतीबा शिक्षण प्रेमी होते. त्याकाळी पुरुषांनाच शिक्षण घेण्याची तरतूद होती या उलट स्त्रियांना दुय्यम दर्जा त्याचं जीवन खूपच कष्टमय असायचे.
ज्योतीबा समाज सुधारक होते. त्यांनी विचार केला जर *एक स्त्री शिक्षित झाली तर संपूर्ण घर शिक्षित होईल.* या विचारांनी त्यांनी आपल्याच बायकोला शिक्षित केले आणि तिला शिक्षिका करून मुलीसाठी पहिली शाळा पुण्यात काढली. त्या त्यांच्या पहिल्या शाळेत फक्त नऊ मुली यायच्या.
सावित्रीबाई फुले यांनी 19व्या शतकात स्त्री शिक्षणाचा पाया तेव्हा घातला होता.
सावित्रीबाई फुले समाजसेविका आणि शिक्षिका होत्या. ज्यांनी शिक्षण मिळवून केवळ समाजातील वाईट प्रवृत्तींचाच पराभव केला नाही, तर जेव्हा समाजात अनेक प्रकारचे लिंगभेद होते अशा वेळी मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडण्याचे महान कार्य त्यांनी केले.
शाळेत शिकवायला जात असता गावकऱ्यांनी त्याचा खूप छळ मांडला. शेण ,गोटे, दगड शाब्दिक मारा सहन करत त्या जोमाने आपलं कार्य करत राहिल्या. मुलीना शिक्षित केले. ज्योतीबानी म्हटल्या प्रमाणे स्त्री शिक्षित झाली. आज त्याचा प्रभाव आपण सगळेजण पाहतोच आहोत.
समाजात पसरलेल्या महिला हक्क, शिक्षण, अस्पृश्यता, सतीप्रथा, बालविवाह, विधवा-विवाह आणि अंधश्रद्धा या विरोधात सावित्री व ज्योतिबा फुले यांनी खूप सघर्ष केला.
ज्योतीबा व सावित्रीबाई यांना मूलबाळ नव्हते म्हणून त्यांनी यशवंतरावला दत्तक घेतले.
ज्योतीबा व सावित्रीबाई दोघांनी खाद्यांला खांदा लावून समाज कार्य केले. ज्योतीबाच्या निधना नंतर ही त्यांनी स्वतःला समाज सेवेत जुंपून घेतले.
त्यांच्या मुलासह त्यांनी पुढे समाजासाठी चांगले कार्य केले. 1897 मध्ये सावित्रीबाई व त्यांचा मुलगा यशवंतराव यांनी प्लेगच्या रूग्णांच्या उपचारासाठी रुग्णालय सुरू केले होते. पुण्याच्या या रुग्णालयात यशवंतराव रूग्णांवर उपचार करायचा आणि सावित्रीबाई रुग्णांची काळजी घेत असत. यावेळी त्या देखील आजारी पडल्या आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
अशा महान समाज सुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना माझा त्रिवार वंदनीय आदरणीय शिर साष्टांग दंडवत 🙏🙏
शोभा वागळे
मुंबई.
8850466717