You are currently viewing देवगड तालुक्यातील आरटीओ कॅम्प तातडीने सुरु करा : आ. नितेश राणे

देवगड तालुक्यातील आरटीओ कॅम्प तातडीने सुरु करा : आ. नितेश राणे

देवगड

कोविड मुळे बंद असलेले देवगड तालुक्यातील आरटीओ कॅम्प तातडीने सुरु करा अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग आरटीओकडे केली आहे

कोविडची तीव्रता कमी झाल्याने आता सर्वच व्यवहार सुरळीत होत आहेत यामुळे हे आरटीओ कॅम्प हे सुरू करावेत अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी पत्राद्वारे केली आहे,पत्रात त्यांनी म्हटले आहे की आपल्या कार्यालयामार्फत देवगड जि. सिंधुदुर्ग येथे जनतेच्या सोईसाठी दरमहा ठराविक दिवशी कँपचे आयोजन करण्यात येत होते.
त्यामुळे वाहन मालक व चालक यांची ओरोस मुख्यालयाला जाण्याची फेरी वाचत होती. परंतु कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये सदरहू कँप बंद करण्यात आला. त्यामुळे वाहन मालक व चालक यांची फार मोठी गैरसोय होत आहे.
आता कोरोना महामारीचे संकट दूर झाले असून जनजीवन सुरळीत होत आहे. तरी देवगड येथील बंद करण्यात
आलेला तालुकास्तरीय कँप पुन्हा सुरू करावा, असे या पत्रात म्हटले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा