परुळे :
काल महिला दिनाचे औचित्य साधून मा.राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्रातील कर्तुत्वावान नवदुर्गांचा गौरव करण्यात आला.या नवदुर्गांमधे आपल्या परुळे गावची सुकन्या दुर्गकन्या सुवर्णा वांयगणकर हिचाही सन्मान करण्यात आला. ही खरोखरच परुळ्यासाठीच नाही तर संपूर्ण सिंधुदुर्ग साठी अभिमानाची गोष्ट आहे.सुवर्णाने जवळजवळ सर्व गड किल्ल्यांवर आपला पाय लावलेला आहे. वैशिष्ट्य म्हणजे ती नउवारी नेसुन ही दुर्गभ्रमंती करत असते. हे करत असताना ती गडसंवर्धनासाठीही प्रयत्न करत असते.तीच्या या दुर्गप्रेमाची शासन स्तरावर दखल घेतली गेली ही कौतुकास्पद बाब आहे.परुळे किल्ले निवती येथील किल्ल्यावर होणा-या संवर्धन मोहिमात ती कायम पुढे असते.सध्या ती ट्रेकिंगची आवड असणा-या माहिलांना दुर्गभ्रमंती करुन आणण्याचे काम करते आहे.तसेच नुकताच तीने कर्ली नदीच्या संर्वधनासाठी कर्ली नदीची परिक्रमा करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. पण ही खर्चिक बाब असल्याने तीला आर्थिक मदतीची गरज भासत आहे. गड किल्लेे संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याने जास्तीत जात लोकांनी यात स्वारस्य दाखवावे असा तीचा मानस आहे.सुवर्णाच्या या सन्मानाबद्दल समस्त परुळे वासियांतर्फे तिचे मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा …!!!