भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश आंदोलन समिती प.महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती अध्यक्ष सांगली जिल्हा अहमद मुंडे यांचा लेख
आपणांस माहिती आणि वरचेवर परिचयाचा असणारा हा शब्द आपणांस बरेच काही सांगून जातो. एखादी विपरीत गोष्ट जसं चोरी. खून. किंवा अन्य कोणताही मानवी जीवनास किंवा जनावरें यांना घातक ठरणारा असा प्रकार झाला असेल किंवा वारंवार होत असेल तर असा कोणताही विपरीत प्रकार पुन्हा घडू नये यासाठी त्या गल्लीतील. लोक एकत्र येऊन एक विशिष्ट संध्याकाळची वेळ ठरवून आपल्या व आपल्या गल्लीतील मालमत्ता रक्षण करण्यासाठी करण्यात येणारा लोकसहभागातून एक प्रयत्न म्हणजे गस्त होय
आपल्या गावात शहरात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये सुध्दा आपल्या कुटुंबाची काळजी न करता किंवा आपल्या जीवाची फिकीर न करता रांत्र दिवस आपल्यासाठी व आपले गाव शहरं तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी झटणारे आपले पोलिस बांधव आपण बघतो आपल्या गावात शहरांत एक वेळ निश्चित केलेली असतें त्यावेळेस कोणताही अनोळखी व्यक्ती रात्री अपरात्री फिरत असेलतर त्याची चौकशी करणे किंवा चौकशी साठी त्याला ताब्यात घेणे. हे सर्व काम पोलिस प्रशासन करत असतें. यामुळे परराज्यातून कामानिमित्त येणारे लोक विविध अवैध धंदे करणारे लोक. चोरीच्या नियोजनाने आलेले लोक. किंवा अपहरण. खून खंडणी. अशा विविध मानवी जीवनास धोका निर्माण करणारे प्रकार घडू नये यासाठी रात्री अपरात्री पोलिस प्रशासन गस्त घालत असते.
प्रथम नागरिक म्हणून आपले परम कर्तव्य आहे की आपण सुद्धा यांना मदत करणे गरजेचे आहे. पूर्वी लोकसंख्या कमी होती लोकांच्या अशा आकांक्षा कमी होत्या. लोकांचे चैनी. व मौज मजा करण्यासाठी हवा तेवढा पैसा उपलब्ध नव्हता त्यामुळे सर्व देवान घेवाण वस्तूंच्या स्वरूपात होत होती. मग तेव्हा चोरया होत नव्हत्या कां ? होत होत्या पण काय चोरले जात होते त्यावेळी उभे पिक कापणे. पाणी ओढण्यासाठी वापरले जाणारे इंजिन चोरी. जनावरें रात्री अपरात्री गाडीत घालून गायब करणे झाडे तोडून नेणे असे प्रकार होत होतें. त्यावेळची लोक धाडसी होती रानांत किंवा घरांत सुध्दा झोपताना त्यांच्या उशाला काठया कुरहाडी असायच्या पण आज आपल्या उशाला आहे ते म्हणजे तंबाखू गुटखा पुडी. दारु बाटली. मग आपल्याला चोर आलेला चोरी झालेली कळणार कशी. त्या काळात प्रत्येक गावाला गंजीखाना होता शेताची राखण करण्यासाठी सर्वात प्रामाणिक आणि विश्वास पात्र असणारे रामोशी लोक होती मग कोणाची काय बिशाद चोरी करण्याची. त्यावेळच्या लोकानी धोका आहे आणि तो समोरच्या लोकांना सांगायचा आहे तर आरोळी देत असतं. आरोळीचा आवाज एक किलोमीटर जात असे. त्यावेळी सी सी टिव्ही कॅमेरे होते का ? सुई पडली तर सापडेल एवढा उजेड होता का ? पण आज सर्व काळ बदलला आणि आपण आज
लोकसंख्या वाढली आणि राहण्याच्या प्रश्न निर्माण झाला लोकांना मोकळं राहण्यास अडचणी येण्यास सुरुवात झाली. जागा शिल्लक नाही जागेचे दर अस्मानाला ठेकले. लोकांचे स्वप्नातील घर अपार्टमेंट मध्ये गेलं आणि एका खुराडयात कोंबड्या कोंडावया तसं जीवन माणसाचं झालं. आपल्या घराजवळ कोण राहत. आपल्या गल्लीत नविन कोण आलंय आपणास कळतं सुध्दा नाही याला कारणीभूत आहे ते म्हणजे आपण आपली माणूसकी विसरलो. आपला शेजारी मृत्यू झाला हे आपणास चार पाच दिवसाने कळतं म्हणजे किती वाईट प्रकार आहे बघा ? संध्याकाळी चोर आणि जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी लोक दारात अग्नी पेटवून ठेवत होती कारणं जोपर्यंत आग जळत आहे म्हणजे लोक जागत आहेत त्यामुळे चोरी होत नसे. जुन्या काळात कौलारू. पत्र्याची गवताची घर होती एवढी काय व्यवस्थित नव्हती पण लोक सुखी आणि समाधानी होती संध्याकाळी जेवण झाल्यावर. लोक एकामेकांच्या दारात गप्पा मारत होती सुखाच्या दुःखाच्या गोष्टी करत होती. आज काळ बदलला आणि गप्पा आपण विसरलो मोबाईल टिव्ही. यामध्ये एवढं गुंग झालो कि आपण जेवन खान विसरलो मग गाडया नव्हत्या. आज सर्व सेवा सुविधा आल्या घर फॅशनी झाली काचेचे महल तयार झाले त्यात दिसतंय पण आवाज येत नाही. आत काय चाललंय हे समजतं नाही. इमारतींना मोठ मोठी कंपाऊंड वॉल झाली मोठ मोठी गेट झाली. आणि आपल्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी माणसांपेक्षा कुत्र्याचा वापर होण्यास सुरुवात झाली तरी सुद्धा संरक्षण मुद्दा ऐरणीवरच आहे.
आज होणार या चोरयाचे कारणं आहे ते म्हणजे बेरोजगारी. हाताला काम नाही. हातात पैसा नाही. कमी वेळात कमी श्रमात जास्त पैसा मिळविण्याची लालसा. व्यसन भागविण्यासाठी पडेल तो मार्ग निवडणारी तरुण पिढी. अश्या विविध कारणांमुळे आज चोरी प्रमाण वाढले आहे. अश्या चोरांचे लक्ष असणारे ठीकाणे म्हणजे बंद घर. गाडया. बाहेर असणारे बोअरवेल मोटर. नळाच्या मोटरा. बिल्डिंग मटेरियल. आणि ज्यांची मुले बाहेर नोकरी करतात आणि आपल्या राहत्या घरात वयोवृद्ध आई वडील यांना ठेऊन परराज्यात नोकरी करणारी अशी कुटुंबे. यांवर असे चोर लक्ष ठेवून असतात. आणि वेळेचा फायदा घेऊन शस्त्र दरोडा घालतात. यावेळी जर कोणी दंगा करण्याचा प्रयत्न केला तर वेळ पडल्यास त्याला बेदम मारहाण करणे. सोन पैसा. व जंगम मालमत्ता लुटणे. महिलांवर अतिप्रसंग करणे हे सुध्दा प्रकार घडतात. कुटुंबातील सर्व सदस्यांना कोंडून घालणे. असं प्रकार आपणं वेळोवेळी वृतमानपत्रात वाचतो दूरदर्शन वर बघतो आपण सतर्क राहण्याची गरज आहे
चोरीच्या घटना अपहरण खून पूर्ववैमनस्यातून. खंडणी. हे सर्व थांबावे यासाठी आपल्या प्रगतशील तंत्रज्ञानी लोकानी. सी सी टिव्ही हा महत्वाचा पर्याय शोधून काढला आहे. आज सर्वत्र म्हणजे रस्त्यालगत. शहरांत सिग्नल वर. मोठ मोठ्या बॅंका पतसंस्था पेट्रोल पंप व्यापारी केंद्र पतपेढी. वाहनं तळ. एस टी डेपो. जिथ जिथ लोकाची वर्दळ जास्त आहे अशा सर्व ठिकाणी आज आपणं सी सी टी बसविलेले बघतो पण विचार करायला लावणारी परस्थिती आज आपल्या पुढे आ वासून उभी आहे ती म्हणजे तरिसुधदा चोरट्यांचे प्रमाण रोजच्या रोज वाढतच आहे. म्हणजे माणूस झोपला असेल पण तंत्रज्ञानी लोकानी तयार केलेला सी सी टिव्ही कॅमेरा झोपतो काय ? मग याचा अर्थ असा होतो का. आपल्या गस्त आणि सी सी टिव्ही कॅमेरा पेक्षाही चोर हुशार आहेत कां ? प्रश्न मोठा आहे. रात्री अपरात्री चोरी होतें हे आपणास माहीत आहे पण आज दिवसाढवळ्या सुध्दा चोरी होत आहे. जाता जाता गाडीवरून धुम स्टाईलने गळ्यातील दागिने लंपास करणारे शहरातील रस्त्यांवर दुकानांत असणार्या सी सी टिव्ही मध्ये कैद कसे होत नाहीत. शहरातील किरकोळ लहान लहान चोरया करणारे. पाकिट मारणारे. यांच्या बद्दल असं बोललं जातं की पोलिस आणि चोर यांचं संगनमत असतं चोरीचा मुद्देमाल अर्धा अर्धा वाटून घेतात हे मी ऐकलं आहे खर देव जाणे होत असेल विचार करावा?
आज आपल्या शहरात जागोजागी चोरयांचे प्रमाण वाढले आहे. हे जर कमी करणे एवढेच नाही तर पूर्ण थांबले पाहिजे अस वाटत असेल तर प्रशासनाकडे एवढं माणूस बळ नाही की ते आपल्या प्रत्येक वार्ड गल्ली वस्ती. येथे पोलिस तैनात करतील. त्यामुळे आपल्या आपण कष्टाने मिळविलेल्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी आपणच प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी आपल्या वार्ड. गल्ली. वस्ती. येथील लोकांशी चर्चा करा. आत्ता प्रत्येक घरात अॅनडराॅइड मोबाईल आहे प्रत्येकाने आपल्या गल्लीतील लोकाचा व्हाॅटसाप ग्रुप तयार करा त्यामुळे आपल्यात होणारें सर्व उचित अनुचित प्रकार याची माहिती सर्वांना मिळेल. आपल्या गल्लीत. वार्डातील काही इमारती मध्ये नवीन राहण्यास आलेल्या लोकाची माहिती पोलिसांना द्या. फेरीवाले. चादर बेडशीट. विविध उपकरणे रिपेअरी करणारे. औषधविक्री करणारे. वायरमन. सर्वेक्षण करण्यासाठी फिरणारे. आधारकार्ड संबंधित माहिती घेण्यासाठी येणारे. गॅस वितरण करणारे. आपणांस अनोळखी फोन करुन विचारणा करणारे यांना खरी माहिती सांगू नका. वरील. सर्व नियमांचे पालन करा. खात्री पटले खेरीज कोणालाही आपल्या घरांत प्रवेश देऊ नका. वेळ पडल्यास आयकार्ड मागणी करा. संध्याकाळी दार वाजले उठून लगेच बाहेर जाऊ नका. आपल्या संबंधातील लोकांना फोन करा. गस्त घालणारे आपल्याच गल्लीतील वार्डमधील आहेत. का व्यसनी नाहीत ना याची खात्री करा.
. समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९
बांधकाम कामगार यांच्यासाठी महत्वाची सूचना. आज बांधकाम कामगार यांना अट्टल विश्वकर्मा आवास घरकुल योजनेतून घर मिळवून देतो असा प्रचार संघटना सेवाभावी संस्था युनियन एजंट यांनी सुरू केला आहे बांधकाम कामगार यांनी कोणत्याही आमिषाला बळी न कोणाच्याही सांगण्यावरून संघटना सेवाभावी संस्था युनियन एजंट यांना घरबांधणी साठी कोणताही आर्थिक वाटा देऊ नका कारणं आज बरेचं दिवसांपासून हा बांधकाम कामगार यांना घरासाठी पैसे मिळतात अस सांगून लुटलं जात आहे खर म्हणजे आजपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही बांधकाम कामगाराला या योजनेतून घर मिळाले नाही. अमिषाला बळी पडू नका.
पंतप्रधान आवास योजना
रमाई आवास योजना
इंदिरा आवास योजना
वाल्मिकी आवास योजना
शबरी आवास योजना
ह्या सर्व योजना ग्रामीण व शहरी भागांत शासनाने सुरू केल्या आहेत त्यासाठी संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांच्याशी संपर्क साधा आपणांस कोण माहिती देण्यास टाळाटाळ करत असेल तर वरील नंबर वर संपर्क साधावा