You are currently viewing उद्योगाच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक सक्षम व्हावे :भाजप महिला तालुका अध्यक्षा प्राची तावडे*

उद्योगाच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक सक्षम व्हावे :भाजप महिला तालुका अध्यक्षा प्राची तावडे*

वैभववाडी:

उद्योगाच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक सक्षम होणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलांकरिता अनेक योजना आहेत. याचा लाभ महिलांनी घेऊन आर्थिक सबल व्हावे, असे आवाहन भाजपा महिला आघाडी प्रमुख प्राची तावडे यांनी केले. महिला दिनाच्यानिमित्त भाजपा कार्यालयात आज महिलांकरिता उद्योग आधार कार्ड, व ई श्रम कार्डचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा नेहा माईणकर,मा जी महिला व बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे,प.स.सदस्या हर्षदा हरयाण, नगरसेविका यामिनी वळवी, सुंदरा निकम, रेवा बावधाणे, संगीता चव्हाण, सुप्रिया तांबे,नमिता दळवी यासह भाजपच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

श्रीमती तावडे म्हणाल्या, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिलांना रोजगार मिळवून दिला जाणार आहे. केंद्रीय उद्योग खात्याच्या माध्यमातून भविष्यात विविध योजना राबविल्या जाणार आहेत. या सर्व योजनांचा लाभ महीलांनी घेऊन आर्थिक उन्नती साधावी अस आवाहन श्रीमती.तावडे यांनी केले. स्नेहलता चोरगे म्हणाल्या, महीलांनी आता चुल व मुल यामध्येच अडकून न राहता त्यातून बाहेर पडले पाहिजे. महीला अनेक क्षेत्रात संधी आहेत.उद्योग क्षेत्रातही महीलांनी पुढाकार घ्यावा अस चोरगे यांनी सांगितले. तालुक्यातील ७० महीलांची उद्योग नोंदणी करण्यात आली. तसेच त्यांना ई श्रम कार्ड वाटप करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा