कणकवली
सारे” गृह ” जीचे “ऋणी” असते, अशी ती गृहिणी! आज खरे तर अशाच सर्व गृहिणींचा जागतिक दिवस आणि या दिवसाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ(आप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली) आपण आहात म्हणून आम्ही ॐ नमो भगवते भालचंद्राय यांनी
पत्रकारिता या आव्हानात्मक क्षेत्रात गेली १० वर्ष विना खंडित व सबसे तेज पण विश्वासार्ह बातम्या देण्याचे असीधारा व्रत अंगीकारणार्या फोंडाघाट येथील सौ संजना हळदिवे यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ या व्यापारी संकुलनातील सौ मनाली दळवी व सौ भारती यांनी आपल्या भगीनीचा सत्कार करुन वेगळी प्रथा सुरू केली.
या प्रसंगी जेष्ठ पत्रकार श्री अशोक करंबेळकर आणि श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी बोलताना श्री अशोक करंबेळकर म्हणाले, एकंदरीत जिल्हयामध्ये पत्रकारिता क्षेत्रात महिलांचे प्रमाण नगण्य आहे. हे क्षेत्र वलयांकित आहे, येथे ग्लॅमर मिळते पण त्यासाठी फार मोठी आव्हाने पेलावी लागतात, पत्रकारांकडे मदतनीस कार्यालयीन मदतनीस असतात, परंतु गृहिणी पदाची जबाबदारी सांभाळत पत्रकारितेचे आव्हान स्विकारणार्या सन्मानमुर्ती सौ संजना हळदिवे यांचे कौतुक च व्हायला हवे. बातमी मिळविणे, निवड करणे, संपादन करणे, आणि प्रसिध्द करणे असे चौरस काम त्या लिलया करतात, मुळातच नाजूक समजल्या जाणाऱ्या महिला कोणत्या ताकदीच्या जोरावर हे करू शकतात हा संशोधनाचा विषय ठरावा.
सन्मानाला उत्तर देताना सौ संजना हळदिवे यांनी असे म्हटले की, संपूर्ण महाराष्ट्रात सिंधुदुर्गात सर्वात जास्त महिलांचे प्रमाण असून, आजच्या काळात चूल आणि मूल यापुढे जाऊन महिलांनी सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.आज अनेक क्षेत्रात महिला पुरुषा सोबत काम करत आहेत. आजच्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आज विविध स्तरातून महिलांवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही आहे. हे क्षेत्र ग्लॅमरस असले तरी कष्ट करण्याची विश्वासार्हता जपण्याची व गतीने बातम्या देण्याची कसरत प्रत्येक पत्रकाराला करावी लागते. फोंड्यासारख्या निमशहरी भागात रहात असल्याने यावर बंधने ही बरीच येतात, पण गेल्या आठ ते दहा वर्षांत माझ्यासाठी जे नेटवर्क मी तयार केले आहे त्यामुळे मी आज ५-७ कुटुंबाना अल्प स्वल्प रोजगार व मानधन देऊ शकते याचा मला अभिमान वाटतो.
श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर असे म्हणाले की, महिला दिनादिवशीच नव्हे तर रोजच आपण प्रत्येक महिलेचा सन्मान करणे आवश्यक आहे. स्त्रीला आपण देवीचा दर्जा देतो पण तो वास्तवात ही मिळायला हवा, तेथे कसलीही तडजोड असु नये.
उपस्थित सर्वानी अभिनंदन केले, तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.