You are currently viewing बाई म्हणजे

बाई म्हणजे

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.अर्चना मुरुगकर यांची स्त्री जीवनावरील अप्रतिम काव्यरचना

संसाराचे वैभव असते बाई म्हणजे
सोशिकतेचे वैभव असते बाई म्हणजे

समाज देतो घाव उराला दुय्यमतेचे
नवसृजनाचे वैभव असते बाई म्हणजे

फुलाप्रमाणे मुलास जपते काटे वेचत
मातृत्वाचे वैभव असते बाई म्हणजे

रहाटगाडे ओढत असते हसतमुखाने
घर दाराचे वैभव असते बाई म्हणजे

पोत मण्याची जुनीच साडी जरी लेवते
सौभाग्याचे वैभव असते बाई म्हणजे

घेत भरारी सीमा लांघते बाई आता
मर्यादांचे वैभव असते बाई म्हणजे

नवीन कार्ये सवे जुन्यांच्या पेलत जाते
कर्तृत्वाचे वैभव असते बाई म्हणजे

सौ. अर्चना मुरुगकर
तळेगाव दाभाडे 410507
9762863231

प्रतिक्रिया व्यक्त करा