You are currently viewing प्रवास स्त्री – जीवनाचा

प्रवास स्त्री – जीवनाचा

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.उज्वला सहस्त्रबुद्धे यांची स्त्री जीवनाचा प्रवास मांडणारी अप्रतिम काव्यरचना

शतकानुशतकांचा होता स्त्रीस बंदिवास !
स्त्री मुक्तीचा तिने घेतला सतत ध्यास !
घेऊ लागली आता जरा मोकळा श्वास !
उपभोगीत आहे स्त्री म्हणून मुक्त वास!

स्त्री आणि पुरुष निर्मिले त्या ब्रह्माने !
विभागून दिली कामे त्यास अनुरूपतेने!
जनन संगोपन यांचे दायित्व दिले स्त्री ला!
आधार पोषणाचे कार्य मिळे पुरुषाला !

काळ बदलला अन् पुरुषी अहंकार वाढला!
पुरुष सत्तेचा जुलूम जगी दिसू लागला !
स्त्री अबला म्हणून जनी मान्य झाली!
अगतिक दासी म्हणून संसारी ती जगली !
…………………………….

स्त्री शिक्षणाचा ओघ जगी या आला!
स्त्री चा चौफेर वावर जनी वाढला!
चिकाटी, संयम जन्मजात लेणे तिचे !
चहू अंगाने बहरले व्यक्तिमत्व स्त्रीचे !

सर्व क्षेत्रात मान्य झाली स्त्री पुरुष बरोबरी !
दोन पावले पुढेच गेली पण नारी!
न करी कधी ती कर्तव्यात कसूर !
जीवन जगण्याचा मिळाला तिलाच सूर!

स्त्री आणि पुरुष दोन चाके संसाराची !
समान असता वेगेची धाव घेती !
एकमेकास पूरक राहुनी आज संसारी!
दोघेही प्रयत्ने उंच नभी घेती भरारी !

उज्वला सहस्रबुद्धे

प्रतिक्रिया व्यक्त करा