वृत्तसार :
केवळ अत्यावश्यक सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नव्हे तर इतरांनाही मुंबई रेल्वेमधून प्रवास करु देण्या संदर्भात विचार करा, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (२९ सप्टेंबर) राज्य सरकारला केल्या आहेत.
“कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, बेरोजगार झाले,अनेकांचे व्यवसाय बुडाले, मात्र आता अनलॉकच्या माध्यमातून हळूहळू व्यवहार सुरळीत होत आहेत.
सरकारी आणि खाजगी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं सुरु होत आहेत. तेव्हा लोकांच्या प्रवासाबाबतही प्रशासनाने गांभीर्याने विचार करायला हवा. कारण मुंबईसारख्या ठिकाणी प्रत्येकालाच रस्त्याने प्रवास करणं शक्य नाही. मुंबईबाहेरुन येणाऱ्यांचे काही तास प्रवासात जात आहेत.
त्यामुळे लोकल ट्रेन चालू करणं हाच एक पर्याय शिल्लक आहे,” असं मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे.