सावंतवाडी लायन्स क्लबचा उपक्रम
सावंतवाडी
आपले आरोग्य तंदुरुस्त राहून दीर्घायुष्य होण्यासाठी नियमित व्यायाम आणि पोषक आहार आवश्यक आहे असे प्रतिपादन सुप्रीमो जिमचे संचालक सौ. नयना वैभव सावंत आणि वैभव सावंत यांनी येथे केले.
⁰
सर्वोदय नगर येथे नगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ओपन जिम मधील व्यायाम उपकरणाची शास्त्रोक्त माहिती नागरिकांना देण्यासाठी सावंतवाडी लायन्स क्लब तर्फे व्यायाम आणि आहार प्रशिक्षण उपक्रम आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रशिक्षक तज्ञ सौ सावंत बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सावंतवाडी लायन्स क्लब चे अध्यक्ष माजी आरोग्य सभापती एडवोकेट परीमल नाईक तर प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब झोन चेअरमन श्री अशोक देसाई उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वागत करताना गजानन नाईक यांनी चांगल्या आरोग्यासाठी व्यायामाची गरज असून मात्र तो व्यायाम शास्त्रोक्त पद्धतीने व्हावा अन्यथा अपाय होण्याची शक्यता स्पष्ट करून नागरिकांना योग्य मार्गदर्शन व्हावे म्हणून लायन्स क्लब ने हा उपक्रम घेतल्याचे स्पष्ट केले.
लायन्स क्लबचे अध्यक्ष एडवोकेट परीमल नाईक यांनी आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबचे सेवाभावी कार्याची माहिती देऊन लायन्स क्लबच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आरोग्य , शिक्षण, क्रीडा , सांस्कृतिक कार्यक्रम या माध्यमातून तसेच आपत्ती काळात मदतीचे कार्य करून लायन्स क्लबने आपली समाजाप्रती असलेली सेवा उपक्रमाची भावना स्पष्ट केली आहे. सावंतवाडी नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवले जातात त्यातील ओपन जींमचा उपक्रम असून नागरिकांनी त्याचा योग्य लाभ घ्यावा असे आवाहन केले. सुप्रीमो जिंमचे प्रशिक्षक सावंत यांनी व्यायामाची विविध प्रात्यक्षिके , व्यायामापूर्वी करावयाचा वॉर्म अप तसेच ज्येष्ठ नागरिकांना कोणता आहार आवश्यक आहे याची सविस्तर माहिती दिली .उद्यानात बसवण्यात आलेल्या बारा साहित्य उपकरणांची प्रात्यक्षिकासह माहिती देऊन त्याचा वापर कसा करावा हे स्पष्ट केले.
दुसऱ्या सत्रात नागरिकांच्या प्रश्नाला उत्तरे देऊन आरोग्य सुदृढ राखण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. उपस्थित नागरिकांची उंची, वजन ,फॅट याबाबत तपासणी करून मार्गदर्शन केले. लायन्स क्लबचे सेक्रेटरी अमेय पै यांनी आभार प्रदर्शन केले . ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब बोर्डेकर, राजन पोकळे, संतोष चोडणकर, विद्याधर तावडे, डॉक्टर गोविंद जाधव, प्रसाद राऊत आदी सदस्य उपस्थित होते. नागरिकांतर्फे श्री .कालकुंद्रीकर् सर, विजय मुरगूड सर ,तानाजी पालव ,एडवोकेट अजित रणे, श्री पेडणेकर,श्री. सखाराम नाईक, श्री. कामत,अतुल पाटील, श्री अमेय रेडकर, सौ.मेघना राऊल. सौ साटेलकर, सौ. मराठे. सौ भोसले, सतीश नाईक ,सौ.मठकर श्रीमतीी दुखंडे , सौ. गवस आदी नागरिकांनी चर्चेत भाग घेतला .लायन्स क्लबच्या या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी मनःपूर्वक धन्यवाद देऊन स्वागत केले