सावंतवाडी
महिला दिनाचे औचित्य साधून “घे भरारी फाऊंडेशन”,”सारथी फाउंडेशन”, “ग्लोबल फाऊंडेशन”, “वाय एच एस फाउंडेशन” यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या ८ मार्चला आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.यात नेत्रतपासणी, हिमोग्लोबिन तपासणी व डोळे नाक, घसा यांची तपासणी केली जाणार आहे.तरी नागरिकांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष मोहिनी मडगावकर,उपाध्यक्ष रिया रेडीज यांनी केले आहे.
दरम्यान दैवज्ञ गणपती मंदिर सावंतवाडी येथे सकाळी १०:०० ते दुपारी २:३० पर्यंत तपासणी केली जाणार आहे.यावेळी डॉ. मनीवास परब,डॉ.सुभजीत धुरी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले आहे.