You are currently viewing आरवली येथे मधुमेह चिकित्सा शिबिर

आरवली येथे मधुमेह चिकित्सा शिबिर

वेंगुर्ला

श्री देव वेतोबा देवस्थान आरवली व आनंद सेवा प्रतिष्ठान आरवली यांच्या संयुक्त विद्यमाने १६ मार्च व २६ मार्च रोजी श्री देव वेतोबा अन्नशांती सभागृह येथे मोफत मधुमेह चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

दि.१६ मार्च रोजी सकाळी ७.३० वा. रक्ताची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर दि. २६ मार्च रोजी सकाळी ८ वा.ते सायंकाळी ४ वा.या वेळेत तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे रुग्णांची तपासणी, निदान व वैद्यकीय सल्ला देण्यात येणार आहे. या शिबिरास मिरज येथील प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ.मिलिंद पटवर्धन यांच्यासह तेथील तज्ज्ञ डॉक्टर तसेच जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने रुग्णांची तपासणी करुन योग्य तो वैद्यकीय सल्ला देणार आहेत.

त्यांनतर मधुमेही रुग्णांना डॉ. मिलिंद पटवर्धन हे आहार, व्यायाम व जीवनशैली याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. ज्या रुग्णांना या सेवेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी र.ग.खटखटे ग्रंथालय शिरोडा येथे दि.८ मार्च ते दि.१४ मार्च पर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी श्री देव वेतोबा देवस्थान येथे संफ साधावा. या शिबिरामध्ये फक्त १०० रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री देव वेतोबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष जयवंत राय व आनंद सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रघुवीर मंत्री यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा