सावंतवाडी :
सावंतवाडी भाजी मार्केट येथील पानाचे व्यापारी तसेच तारा हॉटेल येथील पानपट्टी स्टॉलचे मालक अनिल वसंत सावंत (वय ५१) रा. सालईवाडा, सावंतवाडी यांचे आज सायंकाळी ४.१५ वाजता अल्पशहा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते.
सावंतवाडी भाजी मार्केट येथे त्यांचा पान विक्रीचा स्टॉल असून तारा हॉटेल सावंतवाडी येथे गेली अनेक वर्षे ते पानपट्टीचा स्टॉल चालवतात. मनमिळावू व शांत स्वभावाचे असलेले अनिल सावंत यांचा मित्रपरिवार देखील मोठा आहे. गेले काही दिवस त्यांच्यावर सांगली येथील दवाखान्यात उपचार घेतले होते. आज संध्याकाळी ४ वाजता अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यासाठी नेत असतानाच वाटेतच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सावंतवाडीतील भाजी मार्केटमधील अनेक व्यापाऱ्यांनी अंत्यदर्शनासाठी त्यांच्या गर्दी केली. सावंतवाडी येथील पान तंबाखू व्यापारी दत्ता सावंत, सुनील सावंत व महाराष्ट्र पोलीस दलातून इन्स्पेक्टर म्हणून सेवानिवृत्त झालेले पुणे स्थित बाळकृष्ण सावंत यांचे ते कनिष्ठ बंधू आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व मुलगी आहे. उद्या सकाळी ८ वाजता त्यांच्यावर सावंतवाडी येथील उपरल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.