ज्या रस्त्याचे काम 1 अक्टोंबर पासुन सुरु होणार आहे त्याच रस्त्यावर 2 दिवस अगोदर वृक्षारोपनाची नौटंकी कशासाठी….?
कुडाळ :
कुडाळ आंबेडकर पुतळा ते एसटी डेपो पर्यंतचे काम हे १ ऑक्टोबर पासून सुरू करण्यात येणार आहे असे कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी अगोदरच जाहीर केले आहे. परंतु प्रसिद्धी करता व स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्याकरिता संजय भोगटे यांनी या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये दिनांक २९ सप्टेंबर रोजी वृक्षारोपण करणार असे जाहीर केले आहे. नगरपंचायतीच्या स्थापनेपासून शहरातील प्रत्येक वाडीतले रस्ते हे नव्याने करण्यात आले आहेत. कुडाळ गांधी चौक ते एसटी डेपो हा एकमेव रस्ता अद्यापर्यंत झालेला नसून त्याची निविदा प्रक्रिया झालेली आहे. संजय भोगटे यांनी कुडाळ शहरात फिरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित रस्ते खड्डेमय झाले आहेत त्यावर देखील अशाच प्रकारचे आंदोलन करावे कुडाळ पोलिस स्टेशन ते आर एस एन हॉटेल तसेच कुडाळ पोस्ट ऑफिस ते नाबर वाडी मार्गे दत्तनगर येथील रस्त्यांची अवस्था ही अत्यंत बिकट झालेली आहे. त्याकडे संजय भोगटे हे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याचे कुडाळ नगरसेवक अनंत धडाम यांनी सांगितले. दुर्लक्षित रस्त्यांवर संजय भोगटे यांनी पुढाकार घ्यावा व तेथेही वृक्षारोपण करावे. वृक्षरोपनासाठी लागणारी झाडे ते स्वत: पुरवतील असे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तसेच रस्ते लवकरात लवकर होण्याबाबत संजय भोगटे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच या भागाचे आमदार व खासदार यांच्याकडे पाठपुरावा करावा. ज्या रस्त्याचे काम १ ऑक्टोबरला सुरू होणार आहे त्या ठिकाणी दोन दिवस अगोदर वृक्षारोपण करायची नौटंकी करण्यापेक्षा जे रस्ते मुळातच मंजूर नाहीत किंवा या रस्त्यांसाठी राज्य शासनाकडे निधी नाही त्या रस्त्यांचा आधी पाठपुरावा करावा आणि मगच नगरपंचायतीच्या रस्त्याकडे लक्ष घालावे असे कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक अनंत धडाम यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुका या पुढील वर्षी होत आहेत आणि त्यामुळेच आपले अस्तित्व दाखवण्याकरता व आमदारांच्या मागे लोटांगण घालुनही अजुनही मिळत नसलेले आयते स्विकृत नगरसेवक मिळवण्यासाठी संजय भोगटे यांनी फुकटचा खटाटोप करू नये कुडाळ शहरातील जनता आपल्याला चांगलीच ओळखून असल्याचे अनंत उर्फ आबा प्रविण धडाम नगरसेवक (माजी उपनगराध्यक्ष), नगरपंचायत कुडाळ यांनी सांगितले तसेच त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे संजय भोगटे यांवर घनाघाती टिका केली आहे.