जागतिक मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी
माझी मातृभाषा
मनात माझ्या भाषांचा पसारा
हजार भाषा एकावेळी मी बोलू कसा?
निटाची एकही भाषा येईना
भाराभर भाषा ओठी ठेवू कशा?
कोट्यावधी लोकांत मी माझी भाषा नेऊ कसा?
माझ्या भाषेला मी अभिजात दर्जा देऊ कसा?
मी येण्या आधी ती होती
मी गेल्यावरही ती राहणार
अशी माझी मातृभाषा
मी जगासमोर मांडू कसा?
✍🏻जागृती नाईक
९९३००९१७१०