You are currently viewing इर्शाद शेख फाउंडेशन आणि वेंगुर्ला तालुका काँग्रेस तर्फे वैद्यकीय शिबिराचे आयोजन 200 रुग्णांची तपासणी

इर्शाद शेख फाउंडेशन आणि वेंगुर्ला तालुका काँग्रेस तर्फे वैद्यकीय शिबिराचे आयोजन 200 रुग्णांची तपासणी

वेंगुर्ले

वेंगुर्ले येथील इर्शाद शेख फाउंडेशन,आरवली विकास मंडळ संचलित आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्र, वेंगुर्ला तालुका काँग्रेस व डेरवण रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आरवली येथे आरोग्य शिबिराचे तज्ञ डाॅक्टरांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते या शिबीराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून विविध आजारांच्या सुमारे दोनशे रुग्णांची तपासणी करून त्यांना अत्यावश्यक सेवा पुरवण्यात आली.

डेरवण येथील पंत वालावलकर रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टरांकडून ही तपासणी करण्यात आली. यात रुग्णांना तपासणी बरोबरच ई.सी.जी.,एक्सरे,रक्त तपासणी व औषधे मोफत देण्यात आली.
सदर शिबिराचे उद्घाटन आरवली विकास मंडळाच्या ग्रामीण शाखेचे अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर शिवशरण यांच्या हस्ते समय प्रज्वलन करून करण्यात आले. उपस्थित तज्ञ डाॅक्टर्स आणि उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच सहभागी झालेल्या सर्व डॉक्टरांचे व या शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे इर्शाद शेख फाउंडेशनच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. या शिबिरात डेरवण येथील स्त्री रोग तज्ञ डॉक्टर नंदकुमार भोसले, हृदय रोग तज्ञ डॉक्टर आकाश नारायणी, अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सुयश इंगळे, जनरल सर्जन डॉक्टर दीपक शिंदे, नेत्राचिकित्सक डॉक्टर चिन्मय तोरणे यांच्यासह अन्य सहकारी या शिबिरात सहभागी झाले होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख आरवली विकास मंडळाचे उपाध्यक्ष गजानन पेडणेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दादा परब, वेंगुर्ला तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विधाता सावंत, वेंगुर्ला पंचायत समिती उपसभापती सिद्धेश परब,प्रकाश डीचोलकर,प्रफुल्ल परब,आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्राचे दिलीप साळगावकर, प्रकाश रेगे, सुधाकर राणे, डॉ. प्रसाद साळगावकर, एकनाथ केरकर, वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी सभापती जगन्नाथ डोंगरे,बाळू फटनाईक, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव, सागरतीर्थ ग्रामपंचायत सदस्य स्मीता फर्नांडिस, पांडुरंग फोडनाईक, प्रणय बागकर, काँग्रेस विभागीय अध्यक्ष मयुर आरोलकर,किरण तांडेल, उत्तम चव्हाण, शितल मेस्त्री,पंकज नाईक,दिपक चोपडेकर, जिल्हा रुग्णालय,वैद्यकीय उपकेंद्र तसेच आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा